World Cup 2023 : भारत- पाक सामन्यासाठी मुंबईवरून स्पेशल ट्रेन; पहा काय आहे वेळ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या भारतात विश्वचषक स्पर्धेची (World Cup 2023) धामधूम सुरु असून क्रिकेट प्रेमींमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे. भारतात क्रिकेट हा खेळ एखाद्या धर्मासारखा आहे. त्यातच येत्या शनिवारी म्हणजे 4 ऑक्टोबर रोजी भारताचा सामना कट्टर विरोधक पाकिस्तान (IND Vs PAK) सोबत होणार आहे. विश्वचषक स्पर्धेतील (World Cup 2023)  हा सर्वात मोठा हाय वोल्टेज सामना असेल यात शंकाच नाही. क्रिकेट चाहते या सामन्याकडे डोळे लावून बसले आहेत. याच पार्श्वभूमीवर भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी मुंबईहुन अहमदाबादपर्यंत विशेष ट्रेन (Special Train) चालवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे.

पहा काय आहे वेळ? World Cup 2023

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना गुजरात मधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. 14 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या सामन्यासाठी मुंबई सेंट्रलहुन अहमदाबाद साठी विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहे. ही विशेष ट्रेन शुक्रवारी (13 ऑक्टोबर ) रोजी रात्री 9:30 pm ला मुंबई सेंट्रल येथून सोडण्यात येईल. अहमदाबाद येथे  ही ट्रेन शनिवारी ( 14 ऑक्टोबर ) रोजी सकाळी  5:30 am ला पोहचेल. या ट्रेनला मुंबई सेंट्रल, बोरिवली, पालघर , वापी, वलसाड, नवसारी, सुरत, वडोदरा या सर्व ठिकाणी थांबा देण्यात येणार आहे. तसेच  क्रिकेटप्रेमीच्या परतीच्या प्रवासासाठी  देखील रविवारी (15 ऑक्टोबर) रोजी सकाळी 4:00 am ला अहमदाबाद येथून मुंबई सेट्रलसाठी विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहे. ही ट्रेन मुंबई सेंट्रल येथे 15 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:10 pm ला पोहचेल.

पश्चिम रेल्वेद्वारे सोडण्यात येणाऱ्या ह्या विशेष ट्रेनच्या तिकिटांचे दर सुद्धा विशेष असणार आहेत. त्यामुळे तिकीट बुक करताना दर बघूनच तिकीट बुक करावेत. या विशेष ट्रेनसाठीचे तिकीट बुकिंग आज म्हणजेच 12 ऑक्टोबर पासून सुरु होणार असून ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने प्रवाश्यांना तिकीट बुक  करता येणार आहेत.

मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या या ट्रेनला 2 AC tier, 3 AC tier, स्लीपर कोचेस, आणि सेकंड क्लासचे डब्बे देखील जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे सर्व प्रवाश्यांची सोय यामुळे होऊ शकेल अशी विशेष ट्रेन पश्चिम रेल्वेच्या माध्यमातून भारत – पाकिस्तान मॅच बघण्यासाठी जाणाऱ्या प्रवाश्यांसाठी सोडण्यात येणार आहे.