World cup 2023 Tickets Price : वर्ल्डकप तिकीटांच्या किंमती 450 रुपयांपासून सुरु; कसं करायचं बुक? पहा संपूर्ण माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

World cup 2023 Tickets Price |  5 ऑक्टोंबरपासून विश्वचषक म्हणजेच वर्ल्ड कप (World Cup 2023) सामन्यांना सुरुवात झाली आहे. यंदाची विश्वचषक स्पर्धा भारतात होणार असल्याने भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. टीव्ही वर सामने पाहण्यापेक्षा थेट मैदानात जाऊन मॅचेस बघणं प्रत्येक भारतीयांचे स्वप्न असत. त्यातच यंदाच्या वर्ल्ड कप मध्ये एकूण 48 सामने रंगणार आहेत. यामध्ये प्राथमिक फेरीचे 45, सेमी फायनलचे 2 आणि फायनल सामन्याचा समावेश आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची मोठी पर्वणी आहे.

यावर्षी वर्ल्ड कप सामन्यांच्या तिकिटासाठी (World cup 2023 Tickets Price) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने “BookMyShow” सोबत डील केली आहे. तिकीट बुक करण्यासाठी क्रिकेटप्रेमींना सर्वात पहिल्यांदा वर्ल्ड कप वेबसाइटवर जाऊन नोंदणी करावी लागणार आहे. बुक माय शोच्या ऑनलाइन बुकिंगच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या आवडीचे सीट्स देखील सहज निवडता येतील. तसेच तुम्हाला सराव सामन्यांची तिकिटे देखील खरेदी करता येतील. परंतु यासाठी खाली दिलेल्या टिप्स फॉलो करून तिकिट बुक करणे आवश्यक आहे.

तिकीट बुक करण्याची प्रोसेस-

1) सर्वात पहिल्यांदा बुक माय शो वर जावा.
2) तिथे ICC World Cup 2023 पर्यायावर क्लिक करा.
3) तुम्हाला पुढील पेजवर World Cup चे सर्व सामने दिसतील.
4) याठिकाणी तुम्ही तुम्हाला जो सामना बघायचा आहे त्याचे तिकिट शोधा, तसेच कोणती जागा बुक करायचे आहे तो पर्याय निवडा. (तुम्ही जास्तीत जास्त दोन तिकिटे बुक करू शकता.)
5) पुढे गेल्यानंतर तुम्ही तिकिटाचे पैस जमा करून “बुक” बटणावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला तुमची तिकिटे तुमच्या खात्यावर वितरित केली जातील. ICC World Cup 2023 Tickets Booking

World Cup 2023 तिकिट किंमत किती? World cup 2023 Tickets Price

नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद – 500 रुपये ते 25000 रूपये

एम चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू – 750 ते 10,000

एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई – 450 ते 25,000

अरुण जेटली क्रिकेट स्टेडियम, नवी दिल्ली – 750 ते 20,000 रुपये

हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, धर्मशाला – 1000 ते 10,000 रूपये

भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियम, लखनौ -499 ते 10,000

राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, हैदराबाद – 300 ते 20,000 रुपये

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे – 1000 ते 25,000 रुपये

ईडन गार्डन्स, कोलकाता – 650 ते 15,000 रूपये

वानखेडे स्टेडियम, मुंबई – 500 ते 25,000 रुपये