World Cup Final : भारत- ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यापूर्वी आकाशात होणार ‘एअर शो’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारत हा तब्बल 12 वर्षानंतर विश्वचषक स्पर्धेच्या फायनल (World Cup Final) मध्ये पोहचला आहे. ऑस्ट्रेलिया सारख्या बलाढ्य प्रतिस्पर्ध्यासमोर भारताला लढावं लागणार आहे त्यामुळे होणाऱ्या या अंतिम सामन्याची सर्वांनाच उत्सुकता लागून आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर हा अंतिम सामना होणार असून या सामन्याला आणखी खास बनवण्यासाठी भारतीय एअर फोर्सकडून एअर शो केला जाणार आहे. यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थिती लावणार आहेत.

इतिहासात पहिल्यांदाच होणार हवाई शो-

भारताने न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव करत फायनल मध्ये धमाकेदार एंट्री केली. आता 19 नोव्हेंबरला अंतिम सामना ओस्ट्रेलियाविरुद्ध असणार आहे. हा सामना खास बनवण्यासाठी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी भारतीय हवाई दलाचा सूर्यकिरण एरोबॅटिक संघ ‘एअर शो’ सादर करणार आहे. याबाबत माध्यमाशी बोलताना संरक्षण विभागाचे गुजरात जनसंपर्क अधिकारी म्हणाले की, एअर शोचा सराव हा शुक्रवार व शनिवार असा दिन दिवस होणार असून रविवारी खेळल्या जाणार्‍या अंतिम सामन्यापूर्वी (World Cup Final) सूर्यकिरणचा एरोबॅटिक संघ हा 10 मिनिटे अ‍ॅक्रोबॅटिक्सने स्टेडियमवर एअर शो करणार आहे. यामध्ये एकूण 9 विमाने असून त्यांनी देशभरात अनेक एअर शो केले आहेत. परंतु इतिहासात पहिल्यांदाच कोणत्या सामन्यासाठी इंडियन एअर फोर्स एअर शो करणार आहे. त्यामुळे हा सामना अत्यंत खास होणार आहे.

चौथ्यांदा भारत खेळणार फायनल- World Cup Final

भारताने विश्वचषकात यावेळी फायनलमध्ये पोहचण्याची (World Cup Final) चौथी वेळ आहे. भारताने 1983 मध्ये कपिल देवच्या नेतृत्वाखाली पहिला वर्ल्डकप जिंकला. त्यानंतर 2003 मध्ये सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली फायनल मध्ये पोहचला आणि त्यानंतर 2011 मध्ये  टीम इंडियाने घरच्या मैदानावर विजेतेपदाच्या सामन्यात धडक मारली ती महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली आणि त्यावेळी भारतीय संघ चॅम्पियन ठरला होता. आता कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पुन्हा एकदा फायनलला पोचला असून यंदा भारत विश्वचषकावर आपलं नाव कोरणार का? याकडे सर्व क्रिकेटप्रेमींच लक्ष्य लागलं आहे.