World TB Day 2024 | जागतिक क्षयदिन का साजरा केला जातो? जाणून घ्या रोगाची लक्षणे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

World TB Day 2024 | आजकाल अनेक रोग मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहेत. त्या रोगाबद्दल जनजागृती करणे देखील खूप गरजेचे असते . यामुळे काही दिवस हे खास त्या रोगासाठी साजरे केले जातात. जेणेकरून लोकांना त्या आजाराचे गांभीर्य कळेल. आणि त्यावर उपाययोजना देखील ते करू शकतात. आज 24 मार्च या दिवशी जगभरात टीबी डे (World TB Day 2024) साजरा केला जातो. याला जागतिक क्षयदिन असे देखील म्हणतात. परंतु हा दिवस साजरा नक्की का केला जातो? यामागे काही कारणं आहेत ती आता आपण जाणून घेऊया.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांच्या माहितीनुसार 1882 मध्ये 24 मार्च रोजी डॉक्टर रॉबर्ट कोच यांनी घोषणा केली होती की, त्यांना क्षयरोग झाला आहे. तो क्षयरोग होण्यासाठी जे बॅक्टेरिया कारणीभूत आहे त्यांचा शोध लागला होता. त्यामुळे त्यानंतर त्या रोगाचे निदान करणे आणि त्यावर उपचार शोधणे देखील सोपे झाले होते. डॉक्टर रॉबर्ट कोच यांनी हा शोध लावल्या लावल्यामुळे त्यांना 1905 मध्ये नोबल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले होते.

क्षयरोगाचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो. त्याचप्रमाणे सामाजिक परिणामाबद्दल देखील जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या संसर्गजन्य रोगाचा शेवट करण्यासाठीच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. आता क्षयरोग नक्की कसा होतो? त्याची काय लक्षण असतात? हे आपण जाणून घेऊया.

क्षय रोगाची लक्षणे? | World TB Day 2024

  • क्षयरोग हा मायको बॅक्टोरियम या बॅक्टेरियामुळे होतो. हा एक संसर्गजन्य रोग आहे, तरी देखील तो उपचाराने बरा होऊ शकतो. लहान मुलांना क्षयरोगाचा धोका मोठ्या प्रमाणात असतो.
  • मधुमेह, कमकुवत रोगप्रतिकारशक्ती त्याचप्रमाणे कुपोषित आणि व्यसन असणाऱ्या लोकांना देखील या क्षयरोगाचा धोका मोठ्या प्रमाणात असतो.
  • क्षय रोगाची सर्वसाधारण लक्षणे म्हणजे तुम्हाला दीर्घकाळाचा खोकला येतो, छातीत दुखते, अशक्तपणा येतो, तुमचे वजन अचानक कमी होते आणि ताप आणि रात्री घाम देखील येतो.
  • अक्षय रोगाचा परिणाम सगळ्यात आधी फुफुसांवर होतो. त्याचप्रमाणे किडनी मेंदू पाठीचा कणा आणि त्वचेवर देखील याचा परिणाम होतो.

तुम्ही जरी वेळेवर उपचार घेतले तर क्षयरोग (World TB Day 2024) बरा देखील होतो. यासाठी अनेक चाचण्या केल्या जातात. त्यावर अँटीबायोटिक्स वापरून उपचार होतात. परंतु योग्य वेळी जर उपचार घेतले तर हा आजार बरा होतो. 2000 सालापासून साडेसात कोटींपेक्षा अधिक रुग्ण बरे झालेले आहे.