व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

World Voice Day 2023 : का साजरा केला जातो जागतिक आवाज दिन? काय आहे याचे महत्त्व?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज 16 एप्रिल असून दरवर्षी आजच्या दिवशी जागतिक आवाज दिन (World Voice Day) साजरा केला जातो. लोकांना त्यांच्या आवाजाचे महत्त्व समजावे यासाठी हा दिवस आयोजित केला जातो. खरं तर आपला आवाज हीच आपली ताकद असते. समाजात वावरत असताना आवाजामुळे आपली कामे सोप्पी होतात. परंतु काही लोकांना याचे महत्व समजत नाही आणि तंबाखू, धुम्रपान, ड्रग्ज आणि मोठमोठ्याने ओरडणे अशा अनेक कारणांनी ते आपला बहुमूल्य आवाज गमवतात.

काय आहे इतिहास –

राष्ट्रीय आवाज दिन हा 1999 मध्ये, सर्वप्रथम ब्राझीलमध्ये सुरु करण्यात आला. ब्राझीलमधील व्हॉईस हेल्थ प्रोफेशनल्सच्या गटाने या दिवसाची सुरुवात केली. 16 एप्रिल 1999 रोजी, डॉ. नेडिओ स्टीफन यांच्या अध्यक्षतेखालील ब्राझिलियन सोसायटी ऑफ लॅरींगोलॉजी अँड व्हॉईसने हा दिवस ब्राझिलियन व्हॉइस डे म्हणून घोषित केला. यानंतर, 2002 मध्ये, अमेरिकन अॅकॅडमी ऑफ ऑटोलॅरिन्गोलॉजिस्ट-हेड अँड नेक सर्जरीने हा दिवस जागतिक आवाज दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली.

महत्त्व आणि उद्दिष्ट्य –

खरं तर आपला आवाज ही देवाने दिलेली अनोखी देणगी आहे आणि याच गोष्टीची जाणीव लोकांना व्हावी यासाठी ‘जागतिक आवाज दिन’ साजरा करण्यास सुरुवात करण्यात आली. या दिवशी आरोग्याच्या महत्त्वाविषयी जनजागृती करण्यात येते. अनेक लोक दारू पिऊन, धुम्रपान करून, किंवा मोठमोठ्याने ओरडून आपल्या आवाजाचा चुकीचा वापर करतात. तर दुसरीकडे काही चांगल्या सवयी पाळल्या तर नक्कीच तुम्ही तुमच्या आवाजावर मात सुद्धा करू शकता. त्यामुळे आजच्या दिवशी अनेक डॉक्टर आणि संशोधक आवाजाशी संबंधित समस्यांवर काम करणाऱ्या लोकांशी चर्चा करून यावर मात करण्याचा प्रयत्न करत असतात.