World Water Day 2024 | तुम्ही पीत असणारे पाणी स्वच्छ आहे का? ‘या’ सोप्या पद्धतींनी तपासा पाण्याची गुणवत्ता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

World Water Day 2024 | आपल्या आयुष्यात पाण्याला खूप जास्त महत्त्व आहे. आपली पृथ्वी ही जवळपास 70 टक्के पाण्याने व्यापलेली आहे. परंतु तरीही आपल्याला पाण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात दिसतात. कारण या 70% पाण्यापैकी केवळ 3 टक्के पाणी हे पिण्यायोग्य आहे. बाकीचे पाणी हे समुद्रामध्ये असल्यामुळे ते खारट आहे त्यामुळे आपल्याला त्याचा वापर करता येत नाही. आपल्या भारतात 1.4 अब्जहून अधिक लोकसंख्या आहे. पाण्याची मागणी देखील वाढत चाललेली आहे. झपाट्याने वाढणारे कारखाने, लोकसंख्या यांच्यामुळे पाण्यावर नकारात्मक परिणाम होत आहे. पाण्याचा अपव्यय होत आहे आणि जलप्रदूषण देखील मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

आजकाल नद्यांमध्ये तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होताना दिसत आहे. त्याचप्रमाणे पाणी देखील वाया जात आहे. यामुळे लोकांना पाणीटंचाईला सामना करावा लागत आहे. काही लोकांना तर अशुद्ध पाणी प्यायला लागत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम होत आहे. आज 22 मार्च रोजी सर्व जागतिक पाणी दिन (World Water Day 2024) साजरा केला जात आहे. तरी याच निमित्ताने आपण योग्य पाणी कसे ओळखावे हे आपण जाणून घेऊया.

पाण्याचा रंग

तुम्ही एका काचेच्या ग्लासमध्ये पाणी घ्या आणि त्याच्या रंगाचे निरीक्षण करा. जर त्या पाण्याचा रंग पिवळा त्याचप्रमाणे तपकिरी असेल किंवा त्यात कोणत्याही प्रकारचे कण दिसत असतील, तर ते पाणी चांगले नाही. जर वॉटर फिल्टर बसवले असेल आणि त्यातूनही असेच पाणी येत असेल, तर तुम्ही तुमचा वॉटर फिल्टर सर्विसिंग करणे गरजेचा आहे.

पाण्याची पारदर्शकता | World Water Day 2024

पाण्याच्या रंगाबरोबर पाण्याची पारदर्शकता ही पाण्याची गुणवत्ता दर्शवते. पाण्याचा रंग वेगळा किंवा त्यात काही कण असतील, तर पाणी दूषित असेल दिसेल असे पाणी पिण्यास योग्य नसते.

पाण्याचा वास

पिण्याच्या पाण्यात जर कोणत्याही प्रकारचा वास येत असेल, तर देते देखील असेल तर पाणी असू शकते. अनेक वेळा तुम्ही भांड्यात पाणी पितात नसते. त्या भांड्यात एक प्रकारचा वास असतो, त्यामुळे पाण्याला दुर्गंधी येते.

पाण्याची चव

पाण्याच्या चवीनुसार देखील गुणवत्ता तपासली जाते. जर पाण्याची चव कडू येत असेल, तर ते पाणी पिऊ नका. पाण्यात धातूची चव असेल तर त्यात कॅल्शियम मॅग्नेशियम यांसारख्या धातूंची अशुद्धता विरघळलेली असते. त्याचप्रमाणे पाणी जर खारट लागत असेल तर त्यात सल्फेट असू शकते.

पाणी कंटेनर

तुम्ही ज्या भांड्यात पाणी साठवता ते भांडे स्वच्छ असणे खूप गरजेचे असते. कधी कधी पाण्यात असलेल्या अशुद्धतेमुळे त्या भांड्याचा रंग बदलतो. त्यामुळे असे पाणी गाळल्याशिवाय पिऊ नका.