जागतिक स्पर्धेच्या पात्रता फेरीत भारतीय तिरंदाजांनी नोंदवला विश्वविक्रम!

0
58
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आजपासून सुरू झालेल्या जागतिक युवा तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या १८ वर्षांखालील मुलींच्या संघानं पात्रता फेरीत विश्वविक्रमाची नोंद केली आहे.

पर्मीत कौर, गुरजार प्रिया व रिधू वर्षीनी सेंथीलकुमार या खेळाडूंनी पात्रता फेरीत २१६०पैकी २०६७ गुणांची कमाई करताना विश्वविक्रम नोंदवला. आधीच्या विश्वविक्रमाच्या तुलनेत भारतीय संघानं २२ गुण अधिक कमावले आहेत.

भारतानंतर टर्कीचा संघ २०३३ गुणांसह दुसऱ्या, अमेरिकेचा संघ २०२७ गुणासह तिसऱ्या क्रमांकावर आहे. यानंतर उपांत्यपूर्व फेरीमध्ये भारतीय खेळाडूंसमोर यजमान पोलंडचे आव्हान असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here