Tuesday, January 31, 2023

जगातील पहिली Solar- Electric कार लॉन्च; 700 किमी रेंज

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर आता अनेक वाहन उत्पादक कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांवर जोर देत आहेत. त्याचबरोबर काही कंपन्या सौरऊर्जेवर चालणाऱ्या वाहनांवरही काम करत आहेत. त्याचाच भाग म्हणजे नेदरलँड्सस्थित कंपनीने जगातील सोलर इलेक्ट्रिक कार LightYear 0 सादर केली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, ही कार एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल ७०० किलोमीटर धावू शकते.

सहा वर्षांच्या संशोधन आणि विकास, डिझाइन, अभियांत्रिकी, प्रोटोटाइपिंग आणि चाचणीनंतर सौरऊर्जेवर चालणारी ही कार या हिवाळ्यात उत्पादनासाठी तयार आहे, असे कंपनीने आपल्या अधिकृत निवेदनात स्पष्ट केले आहे. सध्या ही कार यूएईमध्ये सादर करण्यात आली आहे. कंपनीने आपल्या वेबसाइटवर या गाडीची किंमत 250,000 युरो (सुमारे 2 कोटी रुपये) ठेवली आहे.

- Advertisement -

या कारमध्ये 60 KW चा बॅटरी पॅक आहे, जो 174hp ची पॉवर जनरेट करण्यास सक्षम आहे. एका चार्जवर ही गाडी तब्बल 625 किमीची रेंज देईल. त्याचबरोबर कारमध्ये सौरऊर्जेसाठी 5 स्क्वेअर मीटर डबल कर्व्ड सोलर बसवण्यात आले आहे. या पॅनलच्या मदतीने ही कार सुमारे ७० किलोमीटरची अतिरिक्त रेंज देते. अशा प्रकारे, ही सोलर इलेक्ट्रिकल कार तब्बल ७०० किलोमीटर पर्यंत धावू शकते. या कारचे टॉप स्पीड 160 किमी प्रतितास आहे आणि ० ते १० सेकंदात ही कार 100 किमी प्रतितास वेग वाढवू शकते .