कुस्तीपटू सुशील कुमार प्रकरणी नवा ट्विस्ट, पोलिसांकडून युक्रेनच्या ‘त्या’ तरुणीचा शोध

नवी दिल्ली वृत्तसंस्था: कुस्तीपटू सुशील कुमार सध्या सागर राणाच्या हत्येच्या प्रकरणात अटकेत आहे. मात्र या प्रकरणाला आता नवा ट्विस्ट आला आहे. या प्रकरणामध्ये युक्रेनच्या महिलेची पोलिसांना चौकशी करायची आहे. सुशील कुमार आणि सागर राणा यांच्यात वैर निर्माण होण्यासाठी महिला कारणीभूत असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्यामुळे सागर राणा आणि सुशीलकुमार यांच्या तसंच त्यांच्या गटात नेमकं कशामुळे विस्कटलं या संबंधाची महत्त्वाची माहिती तिच्याकडे असावी असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

ती महिला कोण?

या महिले बाबत गुढ वाढत असून सोशल कुमारच्या मोडेल टाऊन मधील फ्लॅटमध्ये वास्तव्यात असणारी महिला सध्या कुठे आहे. याबाबत तक्रार किंवा संशयीत यांच्यापैकी कोणालाही माहिती नाही. ही महिला सागर राणा चे मित्र अमित आणि सोनू महल यांच्या ओळखीची होती. तसेच फरार गैंगस्टर काला जेटली याची नातेवाईक देखील होती.मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांकडून सोनूची चौकशी करणार केली जाणार होती पण तो चौकशीसाठी हजर झाला नाही. त्याच रात्री सुशील कुमार कडून सोनू महल आणि अमित त्यांनाही मारहाण करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार सुशील कुमार सोबत अटक करण्यात आलेला अजय कुमार याला ती महिला आवडू लागली होती अजयने महिलेसोबत सेल्फी घेतल्यानंतर दोन्ही गटांमध्ये वाद पहिला झाला होता.

दोन्ही गटात नक्की कशामुळे वाद?

सोनू महल फ्लॅटवर महिलेचा वाढदिवस साजरा केला जात असताना सुशीलचा जवळचा मित्र अजयने महिलेसोबत गैरवर्तन केलं. तसंच सेल्फी काढल्यामुळे सोनूचा संताप अनावर झाला आणि त्यानं सागर सोबत मिळून आधी अजय आणि नंतर सुशील सोबत शाब्दिक वाद घातला. सेल्फी घेतल्यामुळे आपला अपमान झाल्यामुळे अजय दुखावला होता. त्यानंतर त्याने सुशीलला अपमान बदला घेण्यासाठी प्रवृत्त केल्याची माहिती आहे. तोपर्यंत गॅंगस्टर नीरज बवाना सोबत हातमिळवणी केली होती. त्यांना सोनू आणि सागरला आपला फ्लॅट रिकामा करायला सांगितला. त्यामुळं काला जेटली याचा मात्र संताप झाला. कारण त्यांना सुशील कुमारला तो फ्लॅट मिळवण्यासाठी मदत केली होती आणि त्यात शेअर मिळावा अशी त्यांची मागणी होती.

वाद वाढला तेव्हा सागर राणा छत्रसाल स्टेडियम मधून 50 ते 60 कुस्तीपटूंना दुसऱ्या आखाड्यात नेलं सुशीलकुमारने छत्रसाल मधून बाहेर काढलेली विजेंदर ची नावाची व्यक्ती येथे प्रशिक्षण देत होती. सागर आणि विजेंदर यांनी म्हणून नांगलोई इथे आखाडा सुरू केला होता. जिथे छत्रसाल मध्ये जाणाऱ्या कुस्तीपटूंना प्रशिक्षण दिलं जात होतं त्यामुळे सुशील कुमार चा संताप झाला होता आणि त्यांना सागरला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला अजय आणि युक्रेनच्या तरुणीच्या प्रकरणानंतर दोन्ही गट एकमेकांचे शत्रू झाले होते. यानंतर सागर सोनऊ आणि इतर तिघांचे अपहरण करून त्यांना 4- 5 मे च्या रात्री छत्रसाल स्टेडियममध्ये आणलं आणि जबर मारहाण केली त्यात सागर चा मृत्यू झाला अशी माहिती आहे