बवाल, रॉकी और राणी की प्रेमकहानी सिनेमांमुळे प्रेक्षकांची निराशा? फेसबूक पोस्ट चर्चेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बॉलीवूडमध्ये नुकतेच दोन महत्त्वाच्या दिग्दर्शकांचे सिनेमे प्रदर्शित करण्यात आले आहेत. दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा बवाल आणि दिग्दर्शक करण जोहरचा रॉकी और रानी की प्रेमकहानी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मुख्य म्हणजे, अनेकांना हे सिनेमे आवडले आहेत. तर काहींनी यावर टीका देखील केली आहे. सध्या अशीच फेसबुक माध्यमावर करण्यात आलेले टीका चर्चेचा भाग बनली आहे. लेखक मुकेश माचकर यांनी फेसबुकवर या दोन्ही मूव्हीची समीक्षा केली आहे. यामध्ये त्यांनी बवाल आणि रॉकी और रानी की प्रेमकहानी यांच्यातील फरक सांगितला आहे.

त्यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये लिहले आहे की, “दोन्ही सिनेमे लोकप्रिय मसालापटांचा फॉरमॅट वापरून, प्रेक्षकाला बेसावध गाठून अधिक खोलात नेतात, हे त्यांचं समान वैशिष्ट्य. बॉयकॉट बॉलिवुडसारखे ट्रेंड ज्यामुळे जन्माला येतात ती, देशात सगळ्यांनी एकोप्याने राहण्याची, हिटलरी वृत्तीच्या भजनी न लागण्याची शिकवण दोन्ही सिनेमे देतात ही दुसरी शिकवण आहे. बवाल हा टिपिकल प्रवासी सिनेमाचा सांगाडा घेऊन बनवलेला आहे”

पुढे त्यांनी या चित्रपटाची माहिती थोडक्यात सांगितली आहे. “सिनेमातील पत्र, दुसऱ्या महायुद्धाचा इतिहास पाहताना युद्धाने दोन्ही बाजूंचं कसं नुकसान होतं, एखाद्या समुदायाचा द्वेष माणसांचं कसं नृशंस पशूंमध्ये रूपांतर होतं, हे पाहून त्याचा थरकाप उडतर. ते सगळं तो लाइव्ह मुलांपर्यंत पोहोचवतो. या सिनेमाने कॉन्सन्ट्रेशन कँपमध्ये ज्यूंचे जे हाल झाले, त्यांचं फुटकळीकरण केलं अशी टीका काही ज्यू माध्यमांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर केली आहे” असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हणले आहे.

https://www.facebook.com/100002066262093/posts/pfbid0hCwzvchVTmpeB5U9dFrPYQFDZj3bgfp54FbLHmLrxtQWjMYNBSXwJ617nTbMtCzbl/?mibextid=cr9u03

इतकेच नव्हे तर, “हा सिनेमा अमेझॉनवरून काढून टाकावा, अशी मागणी ज्यू समुदायाने केली आहे. त्यांच्या हे लक्षात आलेलं नसावं की अशा युद्धांच्या म्युझियम्समध्ये किंवा अन्यत्रही त्या स्थळाचं गांभीर्य न ओळखता अतिशय उथळपणे वागणारे पर्यटक असतात. त्यांचं प्रतिनिधित्व नायक करतो आहे. व्यक्तिरेखेचा उथळपणा हा सिनेमाचा उथळपणा कसा होईल? सिनेमात एक अल्पेसभाई आणि कंपनीचा ट्रॅक आहे समांतर चालणारा, तोही फार मनोज्ञ आहे” असा सवाल मुकेश माचकर यांनी उपस्थित केला आहे.

याचबरोबर त्यांनी करण जोहरच्या रॉकी और रानी की प्रेमकहानी सिनेमाचे परीक्षण करताना करणने सैराट चित्रपटाचा फार्मूला वापरल्याचे म्हटले आहे. “करण जोहरच्या मूवीची बऱ्याच दिवसांपासून उत्सुकता होती. तर जोहरी छापाचं ओव्हर दि टॉप मसालेदार मनोरंजन असेल, ही अपेक्षा होती. पण, त्याने इथे सैराट फॉर्म्युला वापरला असावा, असं वाटलं” असं त्यांनी म्हणल आहे.

महत्वाचे म्हणजे या मूव्हीविषयी बोलताना, “आपल्यात अनेक भेद, पण आपल्याला एकत्र राहायचं आहे, एकमेकांबरोबर फुलायचं आहे, एकमेकांना सांभाळून जगायचं आहे, हा या सिनेमाचा संदेश काही फक्त त्या दोन कुटुंबांसाठी नाही आणि रॉकी-रानीच्या लग्नापुरता तर निश्चितच नाही. या अख्ख्या देशाची वीण या समजूतदार सौहार्दाच्या धाग्यांवरच टिकलेली आहे.हे दोन्ही सिनेमे ग्रेट म्हणावेत अशा दर्जाचे नाहीत. दोन्हीकडे कथ्य डोक्यात धरून त्याचं कलम कथानकांवर केलेलं असल्याचं देखील माचकर यांनी म्हणले आहे.

दरम्यान, “मूळ ललित साहित्यावर आधारित नसलेल्या बहुतेक सिनेमांची रचना अशीच कृत्रिम असते. त्यांना जे सांगायचं आहे, त्याचं कथानकावर परफेक्ट कलम झालं आहे का, हे महत्त्वाचं असतं. शिवाय, हेही बरोबर, तेही बरोबर, असली बुळचट भूमिका न घेता, दोन्हीकडे दिग्दर्शक एक ठोस भूमिका घेतात, आपण कोणत्या विचारांबरोबर आहोत, ते दाखवून देतात. कसलीही भाषणबाजी न करता वर्तमानाला आरसा आणि आपल्यापरीने दिशाही दाखवण्याचं कलेचं, कलावंतांचं एक काम दोन्ही सिनेमे आजच्या वातावरणात ठामपणे करतात” अशा शब्दात मुकेश माचकर यांनी दोन्ही मूव्हीचे विशेष कौतुक केले आहे.