Xiaomi 14 : प्रतीक्षा संपली!! 7 मार्चला लाँच होणार Xiaomi 14; पहा काय फीचर्स मिळणार

Xiaomi 14 Launched
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Xiaomi 14 : भारतीय बाजारात Xiaomi कंपनीचे स्मार्टफोन चांगलेच प्रसिद्ध आहेत. मह्त्वाची गोष्ट म्हणजे इतर मोबाईल निर्माता कंपन्यांपेक्षा Xiaomi चे मोबाईल तुलनेनं स्वस्त असल्याने ग्राहकांची मोठी पसंती मिळत असते. कंपनी सुद्धा अपडेटेड फीचर्ससह नवनवीन मोबाईल लाँच करत असते. आताही कंपनीकडून Xiaomi 14 मोबाईल लाँच करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. दमदार फीचर्ससह सुसज्ज असलेला हा मोबाईल 7 मार्चला बाजारात येणार आहे. आज आपण या स्मार्टफोनचे खास फीचर्स जाणून घेणार आहोत.

रिपोर्ट्सनुसार, Xiaomi 14 मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.36 इंचाचा डिस्प्ले देण्यात येईल. या डिस्प्लेला 2670 x 1200 पिक्सल रेज्ल्यूशन आणि 3000nits पीक ब्राइटनेस मिळेल. या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नैपड्रैगन 8 जेन 3 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात येणार असून हा मोबाईल Android 14 आधारित HyperOS या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालेल. Xiaomi 14 स्मार्टफोन 8GB रॅम + 256GB स्टोरेज आणि 16 GB रॅम + 512 GBस्टोरेज व्हेरियेण्टमध्ये येऊ शकतो. रॅम जास्त असल्याने मोबाईल हँग होण्याचे कोणतेही टेन्शन नाही .

कॅमेरा – Xiaomi 14

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Xiaomi 14 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. यात 50MP मुख्य कॅमेरा, 50MP टेलिफोटो लेन्स आणि 50MP अल्ट्रा वाइड कॅमेरा दिला जाईल तर समोरील बाजूला विडिओ कॉल आणि सेल्फी साठी 32MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध असू शकतो. पॉवरसाठी यामध्ये 4610mAh बॅटरी मिळेल, ही बॅटरी 90W वायर्ड चार्जिंग सपोर्ट आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करेल. अन्य फीचर्सबाबत सांगायचं झाल्यास, या स्मार्ट फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, IP68 रेटिंग, USB Type-C 3.2 Gen 1 आणि Wi-Fi 7 सारखी वैशिष्ट्ये आहेत.

किंमत किती असेल ?

Xiaomi 14 यापूर्वी चीनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. चिनी बाजारात, हा मोबाईल एकूण 4 वेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला होता ज्याची किंमत 3999 युआन (अंदाजे 46,000 रुपये) ते 4999 युआन (अंदाजे 57,000 रुपये) पर्यंत आहे. त्यामुळे भारतात सुद्धा हा मोबाईल 40 हजार रुपयांपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल असं बोललं जात आहे.