Xiaomi घेऊन येतेय Electric Car; 1000 किलोमीटर रेंज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आत्तापर्यंत मोबाईल, टीव्ही सारखे अनेक इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स बनवणारी प्रसिद्ध कंपनी Xiaomi ने आता इलेक्ट्रिक कार सेगमेंट मध्ये एन्ट्री केली आहे. लवकरच कंपनी जागतिक बाजारपेठेत MS11 नावाची पहिली सेडान इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लॉन्च होण्यापूर्वीच Xiaomi च्या या पहिल्या इलेक्ट्रिक कारचे फोटो लीक झाले आहेत.

शाओमीने 2021 मध्येच इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात प्रवेश करण्याची घोषणा केली होती. शाओमीच्या MS11 चे प्रोडक्शन 2024 मध्ये सुरु होण्याची शक्यता आहे. ही कार सर्वप्रथम चीनमध्ये विकली जाईल. त्यानंतर ती इतर देशांमध्ये पाठवले जाईल. MS11 चे डिझाईन ऑटो एक्स्पो 2023 मध्ये सादर केलेल्या BYD सील्ड इलेक्ट्रिक सेडानसारखे आहे.

ही कार बीवाईडीच्या सील सारखी सुद्धा दिसतेय. कारमध्ये एलईडी हेडलाइट्स देण्यात आले आहेत. याशिवाय ही कार ड्युअल टोन स्कीमसह दिसते. Xiaomi MS11 मध्ये एक मोठी विंडशील्ड उपलब्ध आहे, त्यात खूप मोठी साइड ग्लास देखील आहे. याला पॅनोरामिक सनरूफ देखील मिळतो, जो मागील भागापर्यंत वाढतो.

Xiaomi MS11 इलेक्ट्रिक कारची इलेक्ट्रिक मोटर कंपनी स्वतः बनवणार आहे. या कारची बॅटरी CATL आणि BYD कंपनीकडून बसवली जाईल. खास गोष्ट म्हणजे एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर ही इलेक्ट्रिक कार 1,000 किलोमीटर धावेल असा दावा करण्यात आला आहे. जर खरंच असं झाल्यास या इलेक्ट्रिक कारची गणती जगातील सर्वाधिक रेंज देणाऱ्या इलेक्ट्रिक कारमध्ये मध्ये होऊ शकेल.