हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नुकतीच Xiaomi कंपनीने आपली पहिली इलेक्ट्रिक Xiaomi SU7 EV कार लॉन्च केली आहे. या कारची किंमत 24.92 लाख रुपये इतकी आहे. खास गोष्ट म्हणजे, ही कार अवघ्या 27 मिनिटांत 50,000 वेळा बुक झाली आहे. त्यामुळे या कारमध्ये नक्की फीचर्स कोणते आहेत? हे जाणून घेण्यासाठी ग्राहकांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे. सध्या ही कार 29 देशांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. तर या कारची डिलिव्हरी एप्रिलपासून सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळेच आज आपण या कारविषयी माहिती जाणून घेणार आहोत.
आम्ही सांगू इच्छितो की,Xiaomi SU7 EV कारला 400 मीटर थ्रोसह ॲडॉप्टिव्ह एलईडी हेडलाइट्स देण्यात आले आहेत. तसेच या मॉडेलमध्ये मोठा 56-इंचाचा हेड-अप डिस्प्ले देखील आहे. Xiaomi SU7 मध्ये 16 इंच आकाराचे मोठे इंफोटेनमेंट युनिट आहे. याशिवाय, या मॉडेलमध्ये पूर्णपणे डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि 2 Xiaomi Pad 6S Pro टॅबलेट देखील आहेत. त्यामुळेच या कारला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही कार दिसायला देखील आकर्षित असल्यामुळे तिची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे.
खास म्हणजे, SU7 मध्ये 73.6kWh बॅटरी पॅक आहे. जे एका चार्जवर 700Km पर्यंतची रेंज देते. यात 295bhp ची इलेक्ट्रिक मोटर ही आहे. ज्याच्या मदतीने 100 किमी/ताशीचा वेग केवळ 5.28 सेकंदात गाठता येतो. कारचा टॉप स्पीड 210 किमी/तास आहे. Xiaomi SU7 किंमत ही Tesla Model 3 पण कमी आहे. या कारणामुळेच अवघ्या चार मिनिटात ही कार 10 हजार वेळा बुक करण्यात आली आहे. पुढे जाऊन ही कार BYD शी स्पर्धा करेल असे म्हटले जात आहे.