हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Xiaomi YU7। आजकाल इलेक्ट्रिक गाड्यांची क्रेज चांगलीच वाढली आहे. पेट्रोल – डिझेलच्या खर्चातून सुटका करून घेण्यासाठी अनेकजण इलेक्ट्रिक वाहन खरेदीला प्राधान्य देत आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे इलेक्ट्रिक गाड्यांचा लूक सुद्धा आकर्षक असल्याने खास करून तरुणाईला चांगलीच भुरळ पडत आहे. इलेक्ट्रिक गाड्यांची वाढती डिमांड बघता अनेक वाहन उत्पादक कंपन्या त्यांच्या गाड्या इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये लाँच करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर इलेक्ट्रॉनिक निर्माता कंपनी Xiaomi नेही इलेक्ट्रिक कार बनवली आहे. Xiaomi YU7 असं या इलेक्ट्रिक SUV चे नाव असून सिंगल चार्ज मध्ये 835 किलोमीटर अंतर आरामात पार करते. आज आपण या इलेक्ट्रिक कारचे खास फीचर्स जाणून घेऊयात.
Xiaomi YU7 ची लांबी ४९९९ मिमी, रुंदी १९९६ मिमी आणि उंची १६०० मिमी आहे. या कारला ३००० मिमीचा व्हीलबेस मिळतो. गाडीच्या इंजिन बद्दल सांगायचं झाल्यास, YU7 मध्ये V6s प्लस हायपरइंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 690 PS कमाल पॉवर आणि 528 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. Xiaomi YU7 तीन व्हेरियंट मध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. ही इलेक्ट्रिक कार मोडेना प्लॅटफॉर्मवर बनवली आहे, ज्याची बॉडी अल्ट्रा-हाय-स्ट्रेंथ स्टीलसह स्टील अॅल्युमिनियम हायब्रिड स्ट्रक्चरसह येते.
या इलेक्ट्रिक कारच्या स्टॅंडर्ड मॉडेलमध्ये ९६.३ kWh बॅटरी देण्यात आली आहे. एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर ती ८३५ किलोमीटर पर्यंत रेंज देऊ शकते. प्रो मॉडेलमध्ये ७६० किलोमीटर अंतर तुम्ही पार करू शकता, तर मॅक्स मॉडेलमध्ये १०१.७ kWh बॅटरी बसवण्यात आली असून त्या अंतर्गत तुम्ही ७७० किलोमीटर प्रवास आरामात करू शकता. 800V सिलिकॉन कार्बाइड प्लॅटफॉर्म टेक्निक द्वारे चार्जिंग केलं जाते. यामुळे, ही कार १२ मिनिटांत १०% ते ८०% पर्यंत चार्ज होऊ शकते आणि १५ मिनिटांपेक्षा कमी वेळात ६२० किमीची रेंज देऊ शकते असं म्हंटल जाते.
किंमत किती? Xiaomi YU7
कंपनीने Xiaomi YU7 ची अधिकृत अजून जाहीर केलेली नाही. कदाचित जुलै महिन्यात याबाबत डिटेल्स मिळतील. कारण ही इलेक्ट्रिक कार तेव्हाच सर्वांसाठी उपलब्ध असेल. एमराल्ड ग्रीन, टायटॅनियम सिल्व्हर आणि लावा ऑरेंज या ३ रंगाच्या पर्यायात हि कार लाँच होईल. एकदा लाँच झाल्यावर ती संपूर्ण जगभरात आपला धुमाकूळ घालेल हे नक्की…




