हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । प्रसिद्ध बाईक निर्माता कंपनी Yamaha ने एकाच वेळी आपल्या 4 बाइक्स नवीन अवतारात लॉन्च केल्या आहेत. यामध्ये R15 M, MT 15, FZ-X आणि FZ-S FI यांचा समावेश आहे. Yamaha च्या या नव्या बाईक एप्रिलपासून लागू होणार्या OBD 2 नियमांनुसार तयार करण्यात आल्या आहेत आणि यामध्ये अनेक अपग्रेड फीचर्स सुद्धा देण्यात आले आहेत. Yamaha च्या या गाड्यांचा थेट सामना बजाज पल्सर आणि टीव्हीएस अपाचे या गाड्यांशी होणार आहे.
FZ-S FI मॉडेलमध्ये ऑल-एलईडी लॅम्प आणि इंटिग्रेटेड एलईडी डेटाइम रनिंग लाइट्ससह अपडेटेड हेडलॅम्प मिळतात. या बाईक मध्ये तुम्हाला ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीम आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी मिळेल. FZ-S FI मेटॅलिक ग्रे, मॅजेस्टी रेड आणि मेटॅलिक ब्लॅक या तीन वेगवेगळ्या रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
Yamaha च्या R-15 मध्ये 155cc इंजिन मिळते. तसेच या गाडीमध्ये एलईडी फ्लॅशर्स, स्पेशल सीट, 140 एमएम सुपर वाइड रेडियल रिअर टायर, अॅल्युमिनियम स्विंग आर्म, अपसाइड डाउन फ्रंट फोर्क, टीसीएस, क्विक शिफ्टर सिस्टीम, एरोडायनामिक डिझाइन, अनेक नवीन फीचर्स मिळू शकतात.
FZ-X ला गोल्डन व्हील ट्रिम्स, इंटिग्रेटेड LED DRL लाइट्स, LED टर्न इंडिकेटर, LED टेललाइट्स मिळतात. यात मोबाईल चार्जिंग आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीची सुविधा मिळते. ही गाडी डार्क मॅट ब्लू, मॅट ब्लॅक आणि मॅट कॉपर या तीन कलरमध्ये मिळेल.
Yamaha MT 15 V2 ला 155cc इंजिन देण्यात आलं आहे. यामध्ये एलईडी टर्न इंडिकेटर, एलईडी हेडलॅम्प, टीसीएस, ड्युअल-चॅनल एबीएस, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी मिळते.
किमती किती –
गाड्यांच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास, यातील FZ FI V3 बाइकची किंमत 1,15,200 रुपये आहे. Yamaha MT 15 V2 ची किंमत 168,400 रुपये (एक्स-शोरूम), FZ-S FI ची किंमत 1, 27,400 रुपये (एक्स-शोरूम) आहे. तसेच FZ-X ची किंमत 1,35,900 रुपये (एक्स-शोरूम) आहे.