Yamaha Scooter Recall । प्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपनी Yamaha ने आपल्या 3 लाख स्कूटर परत मागवल्या आहेत. 1 जानेवारी 2022 ते 4 जानेवारी 2024 या कालावधीत उत्पादित केलेल्या Ray ZR 125 Fi Hybrid आणि Fascino 125 Fi Hybrid स्कुटर कंपनीने परत मागवल्या आहेत. ब्रेक लीव्हर फंक्शनमधील काही अडचणींमुळे कंपनीने हा निर्णय घेतला असून सदर ग्राहकांना रिप्लेसमेंट पार्ट मोफत मध्ये देण्यात येणार आहे.
याबाबत यामाहाने एक निवेदन जारी केलं आहे. त्यानुसार कंपनीचे म्हणणे आहे की ते त्यांच्या उत्पादनांच्या उच्च दर्जाच्या आणि सुरक्षिततेच्या मानकांसाठी वचनबद्ध आहे. या अंतर्गत, इंडिया यामाहा मोटर (IYM) ने 125 सीसी स्कूटरच्या सुमारे 3,00,000 युनिट्स स्वैच्छिकपणे परत मागवण्याची (Yamaha Scooter Recall) घोषणा केली आहे. निवेदनानुसार, रे ZR 125 FI Hybrid आणि Fascino 125 FI हायब्रिड स्कूटर मॉडेल्स (जानेवारी 2022 पासून मॉडेल्स) च्या निवडक युनिट्समधील ब्रेक लीव्हर ऑपरेशनशी संबंधित समस्येचे निराकरण करण्याच्या उद्देशाने रिकॉल करण्यात आले आहे. कंपनीने यापूर्वी जुलै 2013 मध्ये 56,082 सिग्नस रे स्कूटर, मार्च 2014 मध्ये 138 R1 मोटरसायकल आणि डिसेंबर 2019 मध्ये 7,757 FZ150 बाइक्स परत मागवल्या होत्या.
ग्राहकांनी काय करावं?? Yamaha Scooter Recall
इंडिया यामाहा मोटरने निवेदनात म्हटले आहे की, रिकॉलसाठी (Yamaha Scooter Recall) पात्रता व्हेरिफाय करण्यासाठी स्कूटरच्या मालकांना इंडिया यामाहा मोटर वेबसाइटवर जावं लागेल. त्याठिकाणी सेवा विभागाच्या पर्यायावर क्लीक करून लॉग इन करणे आवश्यक आहे. त्यानंतर ‘SC 125 व्हॉलंटरी रिकॉल’ वर नेव्हिगेट करणे आणि पुढील प्रोसेसवर जाण्यासाठी त्यांचा चेसिस नंबर आणि अधिक माहिती भरावी लागेल. याशिवाय गर्भकं त्यांच्या जवळील यामाहा सेवा केंद्राला भेट देऊ शकतात किंवा टोल-फ्री नंबरवर कॉल करू शकतात. इंडिया यामाहा मोटरशी १८००-४२०-१६०० वर संपर्क साधू शकता.