हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Yash Raj Films) यश राज फिल्म्स ही भारतीय सिने इंडस्ट्रीशी संबंधित आघाडीचे प्रोडक्शन हाऊस आहे. यश राज फिल्म्सची स्थापना १९७० साली भारतीय चित्रपट उद्योगातील दिग्गज दिग्दर्शक आणि निर्माता यशराज चोप्रा यांनी केली होती. त्यांच्या निधनानंतर पुढे २०१२ पासून त्यांचा मुलगा आदित्य चोप्रा ही कंपनी सांभाळत आहे. यशराज फिल्म ही कंपनी प्रामुख्याने हिंदी चित्रपटांची निर्मिती आणि वितरण करते. त्यामुळे भारतीय सिनेविश्वात सर्वात मोठ्या फिल्म प्रोडक्शनमध्ये यशराजचा समावेश आहे.
आजपर्यंत यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेल्या कलाकृती बॉक्स ऑफिसवर तुफान कामगिरी करताना दिसल्या आहेत. तसेच यशराज फिल्म्सने लॉन्च केलेल्या कलाकाराचे नशीब उजळल्याची अनेक प्रसिद्ध उदाहरणे आहेत. (Yash Raj Films) यामध्ये अनुष्का शर्मा, रणवीर सिंग, परिणीती चोप्रा, अर्जुन कपूर, वाणी कपूर, भूमी पेडणेकर आणि अशी अजून बरीच नाव आहेत. यानंतर आता आणखी काही आगामी कलाकारांचे नशीब चमकवण्यासाठी यशराज फिल्म्सने नुकतेच YRF कास्टिंग ॲप लॉन्च केले आहे. ज्याच्या माध्यमातून जगभरातील कलाकार कास्टिंग कॉलची माहिती मिळवू शकतात आणि त्यांचे ऑडिशनसुद्धा पाठवू शकतात.
YRF कास्टिंग ॲप (Yash Raj Films)
यश राज फिल्म्स कास्टिंग ॲपमध्ये अनेक नवोदित कलाकार त्यांचे प्रोफाइल बनवू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ते कास्टिंग कॉलची माहिती अगदी घरबसल्या मिळवू शकतात आणि मुख्य म्हणजे यावरून ते आपल्या ऑडिशनचे विविध व्हिडीओ शेअर करू शकतात. यामुळे अनेक नव्या कलाकारांना थेट यश राज फिल्म्ससोबत काम करण्याची संधी मिळू शकते.
बनावट कास्टिंग कॉल्सला अटकाव
यशराज फिल्म्स अत्यंत प्रसिद्ध प्रोडक्शन हाऊस आहे. त्यामुळे या नावाने अनेक फेक कास्टिंग कॉल्स येत असतात. अनेक नवोदित आणि होतकरू कलाकार या बनावट जाहिरातींना बळी पडतात आणि त्यांचे करिअर सुरु होण्याआधीच थांबते. (Yash Raj Films) अशा क्राईमला आळा बसण्यासाठी यश राज फिल्म्सने हे अॅप लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे.आता कलाकारांची दिशाभूल न होता ते आपली करिअरच्या दिशेने मार्गस्थ होऊ शकतील.
कोण लीड करणार ?
यश राज फिल्म्सचे कास्टिंग डायरेक्टर शानू शर्मा हे या अॅपसाठी वैयक्तिक कार्यरत असणार आहेत. अर्थात या ॲपच्या प्रोसेसिंगमध्ये ते लीड करणार आहेत. या माध्यमातून येणाऱ्या ऑडिशन्समधून कलाकारांची निवड करणे आणि त्यांचे प्रशिक्षण घेणे हे त्यांचे काम असेल. (Yash Raj Films) या ॲपद्वारे येणाऱ्या सर्व ऑडिशन्सचे ते वैयक्तिकरित्या निरीक्षण करतील आणि कलाकरांना मार्गदर्शन करतील. आतापर्यंत शानू यांनी ‘एक था टायगर’, ‘सुलतान’, ‘टायगर 3’, ‘पठान’, ‘हिचकी, ‘मर्दानी’सारख्या चित्रपटांसाठी YRF सोबत काम केले आहे.
काय म्हणाले शानू शर्मा?
या ॲपबद्दल बोलताना शानू शर्मा यांनी सांगितलं की, ‘यश राज फिल्म्स कास्टिंग ॲप हे इच्छुक कलाकारांना कंपनीद्वारे निर्मित प्रोजेक्ट्ससाठी थेट प्रवेश देण्याच्या दिशेकडे टाकलेले प्रगतशील पाऊल आहे. या संपूर्ण जगभरात अनेक चांगले आणि प्रतिभावान कलाकार आहेत. त्यांचा शोध घेणे या ॲपमूळे आता शक्य होत आहे. या माध्यमातून पहिल्यांदाच एक महत्त्वाकांक्षी कलाकार थेट प्रॉडक्शन हाऊससोबत संपर्क साधू शकणार आहे आणि मुख्य म्हणजे ही प्रक्रिया पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यामुळे आता कलाकार मित्रांना स्वप्न पूर्ण करण्यासाठी कुणावर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही’. (Yash Raj Films)