Yashashree Shinde Murder Case : उरण येथील यशश्री शिंदे (22) प्रकरणाबाबत राज्यभरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पोलीस देखील या प्रकरणाचा मोठ्या कसोशीने तपास करीत असून या प्रकरणात आता खळबळजनक नवनवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी दाऊद शेख याला पोलिसांनी कर्नाटक राज्यातून अटक केली असून त्याची सखोल चौकशी केली (Yashashree Shinde Murder Case) जात आहे.
दाऊदकडे यशश्रीचे आक्षेपार्ह फोटो ? Yashashree Shinde Murder Case
दाऊदकडे यशश्रीचे आक्षेपार्ह फोटो असल्याची माहिती पोलिसांच्या सूत्रांकडून मिळाली आहे. आरोपी दाऊद शेख याच्याकडे यशस्वीचे आक्षेपार्ह फोटो होते असा दावा केला जातो आहे. एका मराठी वृत्तपत्राने असा दावा केला आहे. याच फोटोंच्या मदतीने दाऊद यशश्रीला ब्लॅकमेल करायचा. दाऊद यशश्रीला भेटण्यासाठी उरण इथे आला होता. 25 जुलै रोजी दाऊद आणि यशश्री एकमेकांना भेटले होते. पण याच (Yashashree Shinde Murder Case)भेटीत दोघांमध्ये वाद झाला आणि रागाच्या भरात दाऊदने तिची हत्या केल्याची माहिती आहे.
दाऊदला कर्नाटकात ठोकल्या बेड्या
पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीत दाऊद शेख आणि यशश्री हे एकमेकांना आधीपासून ओळखायचे. यशश्री शिंदे दाऊदला भेटायला गेली होती मात्र त्या दोघांमध्ये त्या दरम्यान वाद झाला आणि शेवटी रागाच्या भरात दाऊदने तिच्यावर चाकूने वार केले आणि यातच यशस्वी गतप्राण झाली. हत्येनंतर दाऊद घटनास्थळावरून पळून गेला. त्याने थेट कर्नाटक गाठलं आणि कर्नाटकातून तो केरळमध्ये जाणार होता. तो वारंवार ठिकाणं बदलत होता. मात्र पोलिसांनी त्याचा माग काढत त्याला केरळला पळून जाण्यापूर्वीच कर्नाटक मध्ये बेडया (Yashashree Shinde Murder Case) ठोकल्या.
यशश्रीचा फोन ठरू शकतो महत्वाचा पुरावा
अत्यंत निर्दयीपणाने यशश्रीची हत्या केल्यानंतर दाऊद घटनास्थळावरून पसार झाला होता. यशश्रीचा मोबाईल फोन गायब आहे. घटनास्थळी तिचा फोन आढळून आलेला नाही. पुरावे नष्ट करण्यासाठी दाऊदने तो लपवला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. पोलीस याच फोनचा शोध घेत आहेत. यशश्रीचा फोन आढळून आल्यास त्यातून अनेक बाबींचा उलघडा होऊ शकतो. कदाचित याच फोन मधील चॅटिंग किंवा अन्य संभाषण या प्रकरणात (Yashashree Shinde Murder Case) महत्त्वाचा पुरावा ठरू शकतील.
मित्राचा दाऊदला न भेटण्याचा सल्ला
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार यशश्रीच्या मित्राने तिला दाऊदला भेटायला जाऊ नको असा सल्ला दिला होता. दाऊद हा मानसिक धक्क्यात आहे. त्यामुळे त्याला भेटणं योग्य नाही. असं त्याने यशश्रीला सांगितले होते पण भेटीतून काही मार्ग निघेल असे यशश्रीला वाटत होते. त्यामुळे दाऊदला भेटायला ती गेली होती मात्र दाऊदने चाकूने भोकसून तिची (Yashashree Shinde Murder Case) हत्या केली.