Yashasvi Jaiswal : सलग 3 चेंडूवर 3 सिक्स; यशस्वीने अँडरसनला चोप चोप चोपला!! (Video)

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Yashasvi Jaiswal : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामान्यातील दुसऱ्या डावात भारताचा आक्रमक सलामीवीर यशस्वी जैसवालने तुफान फलंदाजी करत डबल सेंचुरी झळकावली. सलग दुसऱ्या कसोटीतील त्याचे हे दुसरं द्विशतक असून यशवीच्या या खेळीमुळे भारताने इंग्लंडसमोर तब्बल 557 धावांचे लक्ष ठेवले आहे. यशस्वीने कसोटीमध्ये वन डे स्टाईल बॅटींग करत इंग्लडच्या गोलंदाजांचा पुरता घाम काढला. त्याने 236 चेंडूत 12 षटकार आणि 14 चौकारांच्या मदतीने नाबाद 214 धावा चोपल्या. यातील महत्वाची गोष्ट म्हणजे इंग्लडच्या क्रिकेट इतिहासातील दिग्गज गोलंदाज असलेल्या जेम्स अँडरसनलाही यशस्वीने सोडलं नाही.

यशस्वीच्या १५० धावा झाल्यानंतर २०० धावा पूर्ण करायला त्याने जास्त वेळ घेतला नाही. आपल्या आक्रमतेने यशस्वीने प्रेक्षकांना अक्षरशः वन डे स्टाईल बॅटिंगचा अनुभव दिला. सामन्याच्या ८५ व्या षटकात यशस्वी जैस्वालने जेम्स अँडरसनवर जोरदार प्रहार केला. त्याने सलग ३ चेंडूत ३ सिक्स मारत अँडरसनची चांगलीच पिटाई केली. यातील पहिला सिक्स फाईन लेगवर, दुसरा सिक्स एक्सट्रा कव्हर वरून तर तिसरा सिक्स समोरील बाजूला लॉन्ग ऑनला लगावला. याबाबतचा एक विडिओ सुद्धा समोर आला असून यामध्ये तुम्ही यशस्वीचा रुद्रावतार पाहू शकता.

संपूर्ण मालिकेत 545 धावा- Yashasvi Jaiswal

आपल्या या खेळीदरम्यान, यशस्वीने (Yashasvi Jaiswal) कसोटी क्रिकेटच्या एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम स्वतःच्या नावावर केला आहे. त्याने नवज्योत सिंह सिद्धू आणि मयंक अग्रवाल यांचा विक्रम मोडला. जायस्वालने एका डावात 12 षटकार लगावले. तर नवज्योत सिंह सिद्धू आणि मयंक अग्रवाल यांच्या नावावर प्रत्येकी 8 षटकार मारण्याचा विक्रम आहे. यशस्वी सध्या तुफान फॉर्मात असून आत्तापर्यन्त त्याने या संपूर्ण मालिकेत 545 धावा केल्या आहेत. यापूर्वी विशाखापट्टणम येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीत सुद्धा जैस्वालने 209 धावांची शानदार खेळी केली होती.