Yashasvi Jaiswal संघ बदलणार; क्रिकेट वर्तुळात खळबळ

Yashasvi Jaiswal
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भर आयपीएलच्या धामधुमीत भारताचा युवा टेस्ट सलामीवीर यशस्वी जैस्वालने (Yashasvi Jaiswal) मोठा निर्णय घेतला… यशस्वीने थेट संघच बदलला आहे. यशस्वी जैस्वालने रणजी ट्रॉफी मध्ये मुंबईच्या संघाला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी पुढच्या वर्षी आपल्याला गोवा कडून खेळायला देण्यात यावं अशी मागणी त्याने केली आहे. याबाबत यशस्वी जैस्वालने मुंबई क्रिकेट असोसिएशनला ( MCA) एक मेल पाठवला आणि त्यात त्याने दुसऱ्या संघाकडून खेळण्यासाठी रितसर परवानगी मागितली आहे. यशस्वीच्या या निर्णयामुळे मुंबईच्या रणजी टीमला मोठा धक्का बसला आहे.

यशस्वीने दिले वयक्तिक कारण- Yashasvi Jaiswal

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, यशस्वी जैस्वालने मंगळवारी एमसीएला एक ईमेल लिहून पुढील हंगामासाठी मुंबई ऐवजी क्रिकेट राज्य संघ म्हणून गोव्याकडून खेळण्याची परवानगी मागितली आहे. गोव्याकडून खेळण्यामागे आपलॆ काही वयक्तिक कारणे आहेत असं यशस्वीने म्हंटल आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एका अधिकाऱ्याने पीटीआय च्या हवाल्याने म्हंटल कि, हो, हे आश्चर्यकारक आहे. काहीतरी विचार करून त्याने हे पाऊल उचलले असावे. मला रिलीज करा अशी मागणी यशस्वीने आमच्याकडे केली… आम्ही त्याची विनंती मान्य केली असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

खरं तर गेल्या वर्षी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सर्व खेळाडूंना निर्देश दिले होते की जे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नाहीत त्यांना देशांतर्गत सामने खेळावे लागतील. यशस्वी जयस्वालही (Yashasvi Jaiswal) मुंबई संघाकडून खेळला. त्याने जम्मू आणि काश्मीर विरुद्ध एक सामना खेळला ज्यामध्ये त्याने पहिल्या आणि दुसऱ्या डावात अनुक्रमे ४ आणि २६ धावा केल्या.

यशस्वी हा एकमेव क्रिकेटपटू नाही जो मुंबई संघ सोडून गोव्याकडून खेळेल. त्याच्या आधी सचिन तेंडुलकरचे पुत्र अर्जुन तेंडुलकर आणि सिद्धेश लाड हे देखील गोवा संघाकडून खेळले आहेत. दोघांनीही संघ सोडण्याचे कारण म्हणजे त्यांना जास्त संधी मिळत नव्हत्या, परंतु यशस्वीच्या बाबतीत असे नव्हते .या वर्षी मुंबईसाठी पदार्पण केले. यशस्वी जयस्वालने २०१९ मध्ये मुंबईकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पहिल्या सामन्यात जयस्वाल अपयशी ठरला. पण यानंतर त्याने धावांचा पाऊस पाडला. यशस्वीने ३६ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ६० च्या सरासरीने ३७१२ धावा केल्या. यादरम्यान, जयस्वालच्या बॅटमधून १३ शतके आणि १२ अर्धशतकेही झळकली. त्याच्या कामगिरीमुळे यशस्वीला भारतीय संघात स्थान मिळाले.