यशवंत सहकारी बँक घोटाळा : चरेगावकरांच्या अडचणी वाढल्या; भाजपनेच केली CBI चौकशीची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | यशवंत सहकारी बँक घोटाळा प्रकरणी एक मोठी अपडेट समोर येत आहे. याप्रकरणी भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन ठेवीदारांच्या कष्टाने कमावलेले पैसे परत मिळवण्यासाठी शहा यांची मदत मागितली आहे. यशवंत सहकारी बँकेच्या कथिक घोटाळ्यामुळे ठेविदारांचे पैसे धोक्यात आले आहेत. पूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी आणि ठेवीदारांच्या पैशाचे संरक्षण व्हावे यासाठी आरबीआय ने नियुक्त केलेल्या प्रशासकाची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी मेधा कुलकर्णी यांनी अमित शहा यांच्याकडे केली आहे. यावेळी मेधा कुलकर्णी यांच्यासोबत व्हिसलब्लोअर संजीव दत्तात्रय कुलकर्णी होते, ज्यांनी अनियमिततेचे प्रमाण स्पष्ट करणारी एक व्यापक तक्रार दाखल केली.

संजीव कुलकर्णी यमी आरोप केला की मूळतः त्यांचा भाऊ श्रीकांत दत्तात्रय कुलकर्णी यांच्या नावाने केलेल्या कर्ज प्रस्तावात त्यांचे नाव जामीनदार म्हणून खोटे समाविष्ट करण्यात आले होते. तथापि, ४८ लाख रुपयांचे कर्ज ३१ मार्च २०१७ रोजी सायली शेलार या दुसऱ्या व्यक्तीला देण्यात आले. तक्रारीत पुढे असा आरोप करण्यात आला आहे की ४ एप्रिल २०१७ रोजी बनावट ७/१२ जमिनीच्या उतारे वापरून गहाणखत कागदपत्रे बनावट पद्धतीने तयार करण्यात आली होती, परतू दुर्दैवाने, ६ एप्रिल २०१७ रोजी श्रीकांत कुलकर्णी यांनी आत्महत्या केली…. असे म्हटले जाते की ते आर्थिक आणि भावनिक परिणाम सहन करू शकले नाहीत त्यामुळेच त्यांनी टोकाच पाऊल उचलल….

महत्वाची बाब म्हणजे या तक्रारीत माजी अध्यक्ष आणि भाजप नेते शेखर सुरेश चरेगावकर यांचा समावेश आहे. शेखर चारेगावकर हेच या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार असून त्यांनी आणि त्यांच्या दोन भावांनी मिळून जवळजवळ ५० बेनामी आणि काल्पनिक कंपन्या स्थापन करून १०० कोटी रुपयांहून अधिक कर्जे बुडवली, परंतु त्यांची परतफेड करण्याचा कोणताही हेतू नव्हता असा आरोप आहे.
यशवंत सहकारी बँकेतील आर्थिक गैरव्यवस्थापनामुळे बँकेला संकटात ढकलले गेले आहे, अनुत्पादक मालमत्ता (एनपीए) ५०% पेक्षा जास्त झाली आहे, ज्यामुळे बँक ठेवीदार आणि गुंतवणूकदारांकडून पैसे काढण्याच्या विनंत्या पूर्ण करू शकली नाही.

शेखर चरेगावकर यांनी गैरव्यवहार केलेल्या निधीचा वापर दापोली (रत्नागिरी), पुणे आणि करमाळा (सोलापूर) येथे ७० कोटी रुपयांच्या मालमत्ता खरेदी करण्यासाठी केला असा आरोप केला जातोय… त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबाने चिखली अर्बन को-ऑप बँक (बुलढाणा), द वाई अर्बन को-ऑप बँक आणि द वारणा सहकारी बँक (कोल्हापूर) यासारख्या १५ हून अधिक सहकारी बँकांकडून १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज घेतल्याचे म्हटले जाते – ज्यामुळे सहकारी बँकिंग क्षेत्राच्या आर्थिक आरोग्याला धोका निर्माण झाला होता. राजकीय संबंधांद्वारे या सर्व गोष्टी सोप्प्या पद्धतीने केल्या गेल्या अस बोल जातंय.. याबाबत कराड आणी पुण्यात शेखर चारेगावकर आणि इतर संचालकांविरुद्ध 2 एफआयआर् दाखल करण्यात आलेत.

शिवाय, गेल्या तीन वर्षांच्या ऑडिट अहवालांमध्ये सातत्याने मोठ्या आर्थिक विसंगती आढळून आल्या आहेत. सरकारी ऑडिटर्सनी बँकेचा सध्याचा तोटा ६२ कोटी रुपयांचा असल्याचे सांगितले आहे. एवढच नव्हे तर २०२३-२४ च्या नवीनतम ऑडिट अहवालात यशवंत सहकारी बँकेचे भयानक आर्थिक चित्र रेखाटले आहे. बँकेचे पेड-अप शेअर कॅपिटल ९.१८ कोटी रुपये होते, तर राखीव निधी (BDDR वगळून) ८.४४ कोटी रुपये होते. निव्वळ मूल्य ५.११ कोटी रुपये नोंदवले गेलेय.

या चिंताजनक आकडेवारीचा दाखला देतच खासदार मेधा कुलकर्णी यांनी गृह आणि सहकार मंत्र्यांना भारतीय रिझर्व्ह बँकेला (आरबीआय) तातडीने नियामक कारवाई करण्याचे निर्देश देण्याची विनंती केली आहे. तसेच याप्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी आणि ठेवीदारांच्या पैशाचे संरक्षण व्हावे यासाठी आरबीआय ने नियुक्त केलेल्या प्रशासकाची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी मेधा कुलकर्णी यांनी अमित शहा यांच्याकडे केली आहे.