येवला विधानसभा मतदारसंघात छगन भुजबळ कचाट्यात सापडलेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शरद पवारांचे अत्यंत विश्वासू म्हणून तशी छगन भुजबळांची (Chhagan Bhujbal) ओळख… शरद पवारांच्या मदतीच्या हातानेच मुंबई सारख्या ठिकाणाहून अगदी नव्या कोऱ्या येवला विधानसभेत भुजबळांनी बस्तान बसवलं… आणि ते येवल्याचेच झाले… राष्ट्रवादीला मानणारा कोअर वोटर असल्याने इथं भुजबळ तसे बिनधास्त झाले… अगदी तुरुंगातूनही निवडणूक लढवून त्यांनी आमदारकीचा गुलाल आपल्या कपाळाला लावला, यावरून राष्ट्रवादी येवल्याच्या नसानसात आहे, वेगवेगळ्या शब्दात सांगायला नको… पण हेच भुजबळ राष्ट्रवादीच्या फुटीत अजित दादांसोबत गेले.. आणि सर्वांनाच धक्का बसला.. मराठ्यांच्या विरोधात घेतलेली भूमिका… शरद पवारांवर सडकून केलेली टीका… या सगळ्यामुळे लोकसभा लढवण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले भुजबळ यंदा आपली येवल्याची तरी सीट वाचवू शकतील का? असं म्हणण्याची वेळ आली आहे… येवल्यात भुजबळांच्या विरोधात वातावरण आहे हे पाहता आता त्यांना कात्रजचा घाट दाखवण्यासाठी अनेक इच्छुक निवडणूक रिंगणात उतरू पाहतायत… त्यात अशी काही मंडळी आहे की ज्यांना उमेदवारी मिळाली की भुजबळांचा करेक्ट कार्यक्रम झालाच म्हणून समजा… म्हणूनच येवल्यात भुजबळांचा पराभव करण्याची धमक नेमकी कोणत्या भिडूमध्ये आहे? शरद पवार येवल्यात भुजबळांना नडण्यासाठी नेमक्या कोणत्या चेहऱ्याला मैदानात आणू पाहता येत? त्याचीच ही इनसाईड स्टोरी…

राष्ट्रवादीतले बिग बी छगन भुजबळ यांचा येवला हा बालेकिल्ला.. खरंतर भुजबळांची येवल्याच्या राजकारणात नेमकी कशी एन्ट्री कशी झाली हे पाहणंही फार इंटरेस्टींगय. मुंबईच्या माझगाव ताडवाडीतून भुजबळांचा पराभव झाला. शिवसेनेच्या बाळा नांदगावकरांनी त्यांना पराभूत केलं. त्यानंतर भुजबळयांनी येवला गाठलं. ते कायमचंच.. इथून त्यांना परंपरेने शिवसेना विरोधात लढत देत आले.., पण २००४ ला ३५ हजाराचं, २००९ ला ५० हजार, २०१४ ला ४६ हजार तर २०१९ ला तब्बल ७० हजारांचं लीड घेत भुजबळांनी येवल्याची सीट काढली यावरुन त्यांची क्रेझ आपल्याला समजू शकते….या चारही निवडणुकीतील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भुजबळांच्या विरोधात चारही वेळा मराठा उमेदवार उभे होते.. पण ओबिसींचे नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भुजबळांच्या विरोधात ओबिसी कार्ड कधीच चाललं नाही.. मागच्या दोन्ही निवडणुकीत त्यांनी संभाजी पवारांना मात देत येवल्याची आमदारकी पटकावली होती… पण २०२४ उजाडताना चित्र सगळं बदललंय… भुजबळ अजित पवार गटात आहेत.. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन ते आधीच बॅकफूटला फेकले गेलेत… शरद पवारांनीही पक्षफुटीनंतर येवल्यातूनच पहिली सभा घेतल्यानं आता तुतारीचं टार्गेट भुजबळ असणार हे तर फिक्स आहे… येवल्यात मराठा समाज हा निवडणुकीत हा निर्णायक मतदान करत आलाय. त्यात महाविकास आघाडीने एक्सट्रा एफर्ट लावले तरी भुजबळ यंदा पराभवाच्या काठावर आहेत, असं म्हणायला हरकत नाही…

येवला मध्ये Chaggan Bhujbal कचाट्यात सापडलेत |  Yeola Vidhan Sabha

पण अशातच भुजबळांच्या विरोधात रान तापवलय ते दोन नेत्यांनी.. त्यातलं पहिलं नाव येतं ते दत्ता आव्हाड यांचं…महाराष्ट्र प्रदेश ओबीसी काँग्रेसचे अध्यक्ष दत्ता आव्हाड यांनी नुकतीच शरद पवारांची भेट घेतली… येवल्याच्या मतदारसंघ काँग्रेसी विचाराचा आहे… तसेच मतदार संघातील बरेचसे प्रश्न प्रलंबित आहेत, त्यामुळे तो काँग्रेससाठी सोडण्यात यावा, असं म्हणून दत्ता आव्हाड यांनी अप्रत्यक्षपणे भुजबळांना येणाऱ्या विधानसभेत भिडण्याची भाषा बोलून दाखवली… आधीच मराठा समाज हा भुजबळांवर नाराज आहे. त्यामुळे त्यांची विधानसभेची सारी भिस्त ही ओबीसी समाजावर आहे… मुळात ते ओबीसी नेते म्हणूनच नावारूपास आले… त्यामुळे आता हीच व्होट बँक दत्ता आव्हाड येणाऱ्या विधानसभेत फोडू शकले तर भुजबळांसाठी जिंकणं हरणं हे काठावरती येईल एवढं मात्र नक्की…

दुसऱ्या बाजूला महायुतीतील भाजपमधूनच अमृता पवार यांनी भुजबळांना आव्हान कुठे केलंय…माजी खासदार डॉ. वसंतराव पवार आणि मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार यांच्या कन्या अमृता पवार या राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्या… तसेच गोदावरी बँकेचे अध्यक्षपदही त्यांनी सांभाळलं… मात्र मागच्याच वर्षी त्यांनी राष्ट्रवादीतून भाजपात येत भुजबळांच्या विरोधात लढत देण्यासाठी फिल्डिंग लावली होती… भुजबळ अजित दादांसोबत महायुतीत आल्यावरही काहीही झालं तरी आपणच निवडणूक लढवणार, यावर अमृता पवार ठाम असल्याने आता भुजबळांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत… आधी ज्या भुजबळांना लढत द्यायची म्हटली की भलेभले दिग्गज स्पर्धेतून माघार घ्यायचे… पण त्याच भुजबळांच्या विरोधात दोन हात करण्यासाठी यंदा मात्र ढीगभर इच्छुक तयार आहेत… त्यातही दत्ता आव्हाड हे मैदानात दिसले तर शरद पवार प्लस काँग्रेस प्लस ओबीसी प्लस मराठा प्लस ठाकरे गट अशा सगळ्यांची गोळा बेरीज करून पाहिली तर दत्ता आव्हाड आरामात निवडून येतील अशी परिस्थिती आहे… त्यामुळे महायुतीत राहून… अजित पवार गटात राहून… भुजबळ निवडून येत नाहीत हे आता दिसत असल्यानं भुजबळ आमदारकीच्या तोंडावर काही नवा निर्णय घेतात का? ते पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे…