येरवळे- विंग- घारेवाडी उपसा जलसिंचन संस्थेची निवडणूक बिनविरोध : चेअरमनपदी वसंतराव शिंदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | येरवळे- विंग- घारेवाडी उपसा जलसिंचन संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. संस्थेच्या चेअरमनपदी यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक, विंग गावचे माजी सरपंच बबनराव उर्फ वसंतराव शिंदे यांची तर व्हाईस चेअरमन पदी जयवंत गणपती खबाले यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी शिवाजीराव सपकाळ यांनी काम पाहिले.

गेल्या वर्षीच्या महापुरात ही योजना पूर्णपणे उध्वस्त झाली आहे, योजनेचे सर्व साहित्य वाहून गेले होते. मात्र संस्थेच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना एकत्र करून सर्वांच्या सहकार्याने बबनराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संस्थेला उर्जित अवस्था प्राप्त करून, आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण बनवण्याचा निश्चय नवनिर्वाचित संचालकांनी केला आहे. डॉ. अतुल भोसले यांच्यासह राज्य शासनाकडूनही संस्थेसाठी सहकार्य मिळेल, असा विश्वास चेअरमन बबनराव शिंदे यांनी व्यक्त केला.

कराड तालुक्यातील अत्यंत राजकीय व शेतीच्या दृष्टीने महत्वाची असलेली ही योजना आहे. या गावात शेतकऱ्यांना या संस्थेने अनेक वर्ष चांगले सहकार्य केले होते. परंतु काही कारणाने अडचणीत सापडलेली संस्थेची उभारणी करणे गरजेचे आहे. त्यामुळे आता निवडणूकीनंतर ही संस्था उर्जिंत अवस्थेत येईल अशी आशा शेतकऱ्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे.