मी शरद पवारांचा ऋणी, पण भाजपमध्ये प्रवेश करणार- एकनाथ खडसे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मी शरद पवार यांचा ऋणी आहे. त्यांनी मला संकटकाळात मदत केली मात्र येत्या १५ दिवसात भाजपमध्ये प्रवेश करणार आहे असं म्हणत एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी मोठा निर्णय जाहीर केला. चंद्रपूरच्या सभेत वगैरे माझा भाजप प्रवेश नाही. माझा भाजपप्रवेश हा दिल्लीला होणार आहे असेही खडसेंनी सांगितलं. एकनाथ खडसे यांनी प्रथमच भाजप प्रवेशावर थेट भाष्य केल्याने भर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका बसला आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, माझी भाजपमधील जुन्या नेत्यांशी आणि पदाधिकाऱ्यांसोबत अनेक महिन्यांपासून चर्चा सुरू होती. हे काय आजचं नव्हतं. चार ते सहा महिन्यांपासून त्यांनी अशाप्रकारची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हापासून चर्चा सुरु होती. त्यांचं म्हणणं होतं की मी पुन्हा भाजपमध्ये यायला हवं.त्यानंतर मी काही दिवसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली. आता पुढील १५ दिवसांच्या आत माझा भाजप प्रवेश होईल,” अशी माहिती एकनाथ खडसे यांनी दिली. (Eknath Khadse to Join BJP)

मी शरद पवार यांचा ऋणी आहे. त्यांनी मला संकटकाळात मदत केली. भाजप प्रवेशाचा निर्णय घेण्यापूर्वी जयंत पाटील यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना या निर्णयामागील कारणे सांगितली. त्यांची अनुकूलता प्राप्त झाल्यानंतरच मी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय निश्चित केला असेही एकनाथ खडसे यांनी म्हंटल. दरम्यान, एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यांची कन्या रोहिणी खडसे यांनी मात्र आपण शरद पवार यांच्यासोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केलं आहे. रोहिणी खडसे यांनी स्वतः ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.