यंदाच्या धनत्रयोदशीला जुळून येतोय तब्बल 50 वर्षांनी योग; जाणून घ्या पुजेचा शुभमुहुर्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| हिंदू धर्मातील सर्वात मोठा दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. येत्या 12 नोव्हेंबर रोजी दिवाळी महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण जगभरात साजरी केली जाईल. तर 10 नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी साजरी केली जाईल. धनत्रयोदशी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला साजरी करण्यात येते. या दिवशी आयुर्वेदाचे जनक भगवान धन्वंतरी, कुबेर देव आणि माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते. यावर्षी धनत्रयोदशीला तब्बल 50 वर्षानंतर दुर्मिळ योग जुळून येणार आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी यम पंचक शिववास आणि प्रदोष व्रत यांचा योगायोग असेल. त्यामुळे हा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरेल

कुटुंबावर कुबेर देवाची कृपा राहावी तसेच लक्ष्मी माता प्रसन्न व्हावे यासाठी धनत्रयोदशी दिवशी कुबेर देव माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते. त्यामुळे तुम्हाला हे माहीत असायला हवे की, यावर्षी धनत्रयोदशीच्या दिवशी तब्बल 50 वर्षानंतर एक अद्भुत योग जुळून आला आहे. यादिवशी यम पंचक शिववास आणि प्रदोष व्रत यांचा योगायोग आहे. हा योग तब्बल पन्नास वर्षानंतर तयार होत आहे. या दिवशी तुम्ही कुबेर देवता आणि लक्ष्मी मातेचे मनोभावे पूजा केली तर तुम्हाला कुठूनही अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच यामुळे तुमचे नशीब देखील फळफळून निघेल. इतेकच नव्हे तर, या दिवशी धनू, मकर, मेष, कन्या या राशींना चांगला लाभ होईल.

धनत्रयोदशी पूजेचा शुभमुहूर्त

धनत्रयोदशी दिवशी तुम्ही जर कुबेर आणि लक्ष्मी देवीची मनोभावी पूजा केली तर त्यांची कृपा कायम तुमच्यावर बनवून राहील. परंतु यासाठी तुम्हाला या देवतांची शुभ मुहूर्तावर पूजा करण्याची आवश्यकता आहे. यावर्षी धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्त 12 वाजून 35 मिनिटांनी सुरू होणार आहे. तो 11 नोव्हेंबर रोजी 1 वाजून 57 मिनिटांनी संपेल. तसेच, सायंकाळी 5 वाजून 47 मिनिटांनी लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त चालू होईल. हा मुहुर्त 7 वाजून 49 मिनिटांनी संपेल. या शुभ मुहूर्तावर पूजा केल्यास त्याचे फळ तुम्हाला अवश्य मिळेल.