Tuesday, October 4, 2022

Buy now

निरोगी आरोग्यासाठी केवळ दररोज 15 मिनिटे योगासाठी द्या : डाॅ. रणजीत पाटील

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी

आपल्या हिंदू संस्कृतीत योगाचा जन्म झाला आहे. या योगामुळे मी तंदुरस्त असून कोणताही आजार सहसा होत नाही. आपल्या भविष्याच्या दृष्टीने दिवसातून एकवेळ योगा करणे चांगले आहे. आज अनेकदा 35-40 वयोगटातील लोकांचा हार्ट अॅटकने मृत्यू होत आहे. पोलिसांना रोजचा ताण असतो, अशावेळी दररोज आरोग्यासाठी केवळ 15 मिनिटे योगासाठी देतो, तुम्हीही द्या. आपल्या कुटुंबासाठी व स्वतःच्या आरोग्यासाठी योगा करावा, असे कराड उपविभागीय अधिकारी डाॅ. रणजीत पाटील यांनी सांगितले.

कराड येथील अक्षता मंगल कार्यालयात हॅलो महाराष्ट्र माध्यम समुहाकडून पत्रकार आणि पोलिसांच्या करिता आयोजित योग शिबिरात ते बोलत होते. यावेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, हॅलो महाराष्ट्रचे सीईअो आदर्श पाटील, प्रतिनिधी सकलेन मुलाणी, विशाल पाटील, अक्षय पाटील, संकेत आवळकर यांच्यासह पोलिस व पत्रकार उपस्थित होते.

बी. आर. पाटील म्हणाले, आपले शरीरस्वास्थ हीच आपली खरी संपत्ती आहे. सर्वकाही मिळवता येते मात्र, एकदा कोणता अवयव दुखावला तर तो पूर्वीसारखा मिळत नाही. त्यामुळे देवाने व निसर्गाने दिलेले शरीर जपणे गरजेचे आहे.

आदर्श पाटील म्हणाले, जेव्हा आरोग्याचा विषय येतो, त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. त्यामुळे गणपती बाप्पाच्या आगमानाचे आैचित्य साधून आम्ही योग शिबिर आयोजनाचा निश्चय केला. पोलिस आणि पत्रकार हे सामाजिक बांधिलकी जपणारा घटक आहे. तेव्हा समाजाशी बांधिलकी जपणाऱ्या या दोन्ही घटकांचा विचार करून आम्ही हा उपक्रम राबवत आहोत. यावेळी भरत कदम यांनी सूत्रसंचालन केले. विशाल पाटील यांनी आभार मानले.

Related Articles

Latest Articles