हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| भारतातील मुख्य भाज्यांपैकी फुलकोबी (Cauliflower) एक आहे. शेतकऱ्यांनी फुलकोबीची लागवड केल्यास त्यांना यातून चांगला नफा मिळू शकतो. यावेळी फुलकोबीची अनेक सुधारित जाती आल्या आहेत. ज्याची लागवड उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात करता येऊ शकते. यातूनच शेतकरीही चांगला नफा मिळवू शकतो. नुकत्याच कृषी शास्त्रज्ञांनी फुलकोबीच्या काही जाती विकसित केल्या आहेत. ज्यांची लागवड जुलैमध्ये करता येऊ शकते. सहसा पावसाळ्यात फुलकोबीची लागवड केली जाते. ही लागवड करण्यापूर्वी शेताची व्यवस्थित नांगरणी लागते आणि शेण खतही टाकावे लागते.
लागवडीसाठी किती पैसे खर्च येतो?
फुलकोबीची रोपे 40-45 दिवसांमध्येच तयार होतात. फुलकोबीच्या सुधारित जातीचे बियाणे सुमारे 15,000 ते 20,000 रुपये प्रति 100 ग्रॅममध्ये विकत मिळतात. ज्यांची एक एकरात पेरणी करता येते. याशिवाय लागवड करताना खुरपणी, कीटकनाशके, खते इत्यादींसाठी खर्च करावा लागतो. हा सर्व खर्च 25,000-30,000 रुपयांच्या घरात जातो. म्हणजेच लागवडीसाठी सुमारे 50,000 रुपये खर्च येतो. लक्षात ठेवा की, फुलकोबीची लागवड अतिशय नाजूक पद्धतीने केली जाते. लागवड करताना छोटीशी चूक झाली तरी मोठे नुकसान होते.
फुलकोबीतून उत्पन्न किती मिळते??
फुलकोबीची लागवड केल्यास एकरी सुमारे 100 क्विंटल उत्पादन मिळते. थंडीपूर्वी कोबीचे भाव बऱ्यापैकी असतात. किरकोळ बाजारात फुलकोबी 30 ते 40 रुपये किलोने विकली जाते. म्हणजेच एका एकरात फुलकोबीची लागवड केल्यास 2-2.5 लाख रुपयांचा नफा होऊ शकतो. यातील 50,000 रूपये लागवडीचा खर्च काढून टाकल्यास तुम्हाला दोन लाख रुपयांचा नफा मिळेल. थोडक्यात चार महिन्यांमध्ये तुम्ही 2 लाख रुपये कमवाल.