आता ड्राइविंग लायसन्स घेऊन फिरण्याची गरज नाही; मोबाईलमध्ये इंस्टाल करा हे अँप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जे लोक स्वतः गाडी चालवतात, ते लोक घराबाहेर पडताना सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ड्रायव्हिंग लायसन स्वतःजवळ ठेवत असतात. कारण गाडी चालवताना आपल्याकडे वाहन चालवण्याचा परवाना असणे खूप गरजेचे असते. परंतु अनेक वेळा घाई गडबडीत आपण हे ड्रायव्हिंग लायसन घरी विसरतो. आणि पोलीस आपल्याला पकडतात. अशा वेळी जर आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसन नसेल, तर आपल्याला दंड भरावा लागतो.

परंतु आता जर तुम्ही इथून पुढे तुमच्या ड्रायव्हिंग लायसन घरी विसरलात आणि पोलीस आणि तुम्हाला पकडले, तर तुम्हाला दंड भरण्याची काहीच गरज नाही. आता फक्त तुमच्याकडे दोन ॲप असणे गरजेचे आहे. या ॲपच्या माध्यमातून तुम्ही तुमचा वाहन परवाना घरी विसरले, तरी तुम्हाला कोणताही प्रकारचा दंड भरावा लागणार नाही. तुम्ही मोबाईलच्या मदतीने तुमचे ड्रायव्हिंग लायसन दाखवू शकता. जर तुमच्या मोबाईलमध्ये डीजे लॉकर आणि एमपरिवहन ॲप असेल तर या डिजिटल प्रतच्या माध्यमातून तुम्हाला सुटका मिळू शकते. कारण या ॲप मधील डिजिटल प्रत देखील वैद्य मानली जाते. असे मंत्रालयाने देखील सांगितलेले आहे.

नियम वाचा आणि दंड टाळा

आयटीआय नुसार तुमचे ड्रायव्हिंग लायसन वाहन नोंदणी प्रमाणपत्र अशा कागदपत्रांच्या प्रती तुम्हाला प्रत्यक्षात दाखवणे इथून पुढे बंधनकारक नाही. कारण डीजी लॉकर आणि एम परिवहन ॲपवर देखील या कागदपत्रांची असणारी डिजिटल प्रत वैद्य मानले जाते. याबाबतची माहिती मंत्रालयाने दिलेली आहे.
आता वाहतूक पोलीस त्यांच्या मोबाईल मधून किंवा कोड स्कॅन करून ड्रायव्हर आणि वाहनाशी संबंधित सर्व आवश्यक माहिती मिळवू शकतात. तसेच नियमांचे उल्लंघन जर तुम्ही केले असेल तर या गोष्टींची माहिती देखील आता डिजिटल पद्धतीने ठेवता येणार आहे.

डीजी लॉकर आणि एम परिवहन ॲप कसे वापरायचे

  • तुम्ही यासाठी तुमच्या मोबाईल मध्ये डीजी लॉकर आणि एम परिवहन ॲप डाऊनलोड करा.
  • या ॲपमध्ये नोंदणी करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर टाका त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल तो ओटीपी तिथे द्या.
  • त्यानंतर तुमचे युजर नेम पासवर्ड सेट करून लॉगिन करा.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक डीजी लवकर या ॲपमध्ये लिंक करावा लागेल.
  • ओटीपीद्वारे त्या आधार कार्ड नंबरची देखील पडताळणी केली जाईल.
  • ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुमचे ड्रायव्हिंग लायसन वाहन नोंदणी प्रमाणपत्र विम्याची डिजिटल प्रत डिजी लॉकर वरून तुम्हाला डाऊनलोड करता येईल.