देशात कोरोनामुळे लॉकडाऊन झाले आणि त्यानंतर अनेक लोक हे वर्क फ्रॉम होम करू लागले. त्यामुळे अनेक लोकांनी त्यांच्या घरी वायफाय बसून घेतलेले आहे. घरात वायफाय बसवल्याने लोक हे मोबाईलचा रिचार्ज करत नाही. तुम्ही देखील असे करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण पुढील काळात तुमचा मोबाईल नंबर वापरण्यासाठी तुम्हाला रिचार्ज व्यतिरिक्त आणखी पैसे द्यावे लागणार आहेत. जर तुमच्याकडे सिम कार्ड असून तुम्ही त्याला रिचार्ज करत नसाल तरच तुम्हाला असे करावे लागणार आहे.
अनेक देशांमध्ये मोबाईल नंबरसाठी त्याचप्रमाणे टेलिफोनसाठी समान रक्कम आकारली जाते. कधी कधी या गोष्टी मोबाईल ऑपरेटरवरही लागू होतात. आणि त्यामुळे ग्राहकांना त्याचा फटका बसतो. अशातच आता भारतीय दूरसंचार नियम प्राधिकरणाने हा प्रस्ताव नियम जारी केलेला आहे. म्हणजेच आता जर तुम्ही तुमचे सिम कार्ड जास्त वेळ रिचार्ज केले नाही तर ते ब्लॅकलिस्टला न टाकता मोबाईल ऑपरेटर्स जास्त दंड आकारू शकतात. हे शुल्क एक रकमी किंवा वार्षिक आधारावर घेतले जाऊ शकते. ट्रायने मोबाईल फोन आणि लँडलाईन नंबरसाठी मोबाईल ऑपरेटर कडून शुल्क आकारण्याची ही योजना आणलेली आहे.
ट्रायचा याबद्दल असा विश्वास आहे की, मोबाईल नंबर हा एक सार्वजनिक स्त्रोत आहे, खाजगी नाही. त्यामुळे मोबाईलचा वापर सार्वजनिक कामासाठी कसा करता येईल हे पाहिले पाहिजे. देशात मोबाईल नंबरची मोठी कमतरता निर्माण झाली आहे. तसेच सिम कार्ड दीर्घकाळ रिचार्ज न केल्यास ब्लॅकलिस्टला टाकले जायचे. परंतु आता सिम कार्ड जास्त काळ रिचार्ज न केले तर ते ब्लॅकलिस्टला न टाकता ऑपरेटर्सकडून त्यावर दंड आकारला जाईल.
कोणत्या देशांमध्ये शुल्क आकारले जाते
ट्रायनुसार आत्तापर्यंत डेन्मार्क, दक्षिण आफ्रिका, नायजेरिया, पोलंड, स्विझर्लंड, नेदरलँड, कुवेत, बल्गेरिया होंगकोंग, ग्रीस, युके, फिनलँड, बेल्जियम, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांमध्ये ही योजना आहे.