हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नुकतेच आयकर विभागाने एक परिपत्रक जारी केले आहे. ज्यात येत्या 31 मे 2024 पूर्वी सर्व करदात्यांना त्यांचे पॅनकार्ड (PAN Card) आधारकार्डशी (Aadhaar Card) लिंक करण्यास सांगितले आहे. हे काम 31 मेपर्यंत पूर्ण न केल्यास करदात्यांना त्याचा फटका बसू शकतो. तसे पाहायला गेले तर, आजवर अनेकांना पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक न केल्याचा फटका बसला आहे. कारण, रोजच्या धावपळीत अशी शिल्लक कामे करणे बरेचजण विसरून जातात. म्हणूनच आम्ही सांगू इच्छितो की, तुमचे आधारकार्ड पॅनकार्डशी लिंक आहे की नाही हे तुम्ही एसएमएसद्वारे तपासू शकता.
आयकर विभागाच्या सूचनानुसार, जे लोक अनिवासी आहेत किंवा ज्यांच्याकडे भारतीय नागरिकत्व नाही. त्यांना पॅन कार्ड लिंक करण्याचीही गरज नाही. मात्र, इतर करदात्यांना आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक करण्याची आवश्यकता आहे. ज्यांनी पॅन आधारशी लिंक केलेले नाही अशा अनेकांचे पॅनकार्ड निष्क्रिय करण्यात आले आहे. त्यामुळेच ही वेळ तुमच्यावर ही येऊ नये म्हणून सर्वात प्रथम पॅनकार्ड आधार कार्ड लिंक करून घ्या. यासह एसएमएसद्वारे तपासा की आधारकार्ड पॅनशी लिंक आहे की नाही??
तपासण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा
1 – सर्वात प्रथम SMS मध्ये UIDPAN टाईप करा आणि त्यानंतर स्पेस द्या.
2 – पुढे 12 अंकी आधार क्रमांक लिहा.
3 – त्यानंतर 10 अंकी पॅन क्रमांक लिहा.
4- तुम्हाला SMS UIDPAN <12 अंकी आधार क्रमांक> <10 अंकी पॅन खाते क्रमांक> असा दिसेल.
5 : शेवटी SMS 567678 किंवा 56161 वर पाठवा.
6 – त्यानंतर थोडा वेळ थांबा. जर तुमचे आधार कार्ड पॅनशी लिंक असेल तर तुम्हाला तुमचा पॅन आधारशी लिंक झाल्याचा संदेश मिळेल.
आधार कार्ड पॅनकार्डशी लिंक करा
1 – प्रथम तुमच्या मोबाइलवरून UIDPAN (स्पेस) 12 अंकी आधार क्रमांक (स्पेस) पॅन क्रमांक टाइप करा.
2 – तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 567678 किंवा 56161 वर एसएमएस पाठवा.
3- तुम्हाला एक मेसेज मिळेल जो पॅनशी आधार लिंक केल्याची पुष्टी करेल.