कराडला बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या युवकास अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या युवकास पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केले. त्याच्याकडून पिस्तुलासह तीन गोळ्या हस्तगत करण्यात आल्या. शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कारवाई केली. पंकज मुकेश पाटील (वय- 20, रा. भोई गल्ली, रविवार पेठ, कराड) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील आझाद चौकात एक युवक कमरेला पिस्तूल लावून उभा असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी गुन्हे शाखेला कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. पोलीस कॉन्स्टेबल आनंदा जाधव, सहाय्यक फौजदार जाधव यांच्यासह कर्मचारी तातडीने आझाद चौकात दाखल झाले.
पोलिसांना पाहताच त्या युवकाने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी पाठलाग करुन त्या युवकाला पकडले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या कमरेला एक पिस्तूल व खिशात तीन बुलेट आढळून आल्या. पोलिसांनी 46 हजार रुपये किमतीच्या पिस्तुलासह तीन गोळ्या जप्त केल्या. तसेच संबंधित युवकावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक केले.