धक्कादायक! यवतमाळमध्ये एका माथेफिरू तरुणाकडून शिक्षिकेवर प्राणघातक हल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

यवतमाळ : हॅलो महाराष्ट्र – यवतमाळमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये वणी तालुक्यातील नायगाव (बु) या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिकेवर 22 वर्षीय माथेफिरू तरुणाकडून चाकूने प्राणघातक हल्ला (youth attack on teacher) करण्यात आला. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास घडली. वैशाली चल्लावार असे हल्ला झालेल्या (youth attack on teacher) पीडित शिक्षिकेचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या अर्ध्या तासातच आरोपीला अटक केली आहे.

काय घडले नेमके ?
पीडित शिक्षिका या वणी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या नायगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यरत आहे. त्या आपल्या परिवारासह चंद्रपूरला ये-जा करतात. घटनेच्या दिवशी शिक्षिका आपले अध्ययनाचे कार्य पार पाडून शाळा सुटल्यावर चंद्रपूर येथे जाण्यासाठी निघाल्या होत्या. या दरम्यान त्यांच्यावर हा हल्ला (youth attack on teacher) करण्यात आला. त्या नायगाव फाट्यावर आल्या, यावेळी वाहनाची वाट पाहत असताना अचानक एका माथेफिरु युवकाने त्यांच्यावर चाकूने हल्ला (youth attack on teacher) केला. या हल्ल्यात त्या गंभीर झाल्या.

आरोपी हल्ला (youth attack on teacher) करुन पळून जाण्याचा बेतात असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. या आरोपी तरुणाच्या हल्ल्यात शिक्षिका जखमी झाल्याचे लक्षात येताच आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांना घुग्गुस येथील रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले. या माथेफिरूं तरुणाचे नाव राजू अन्सारी असे आहे. या आरोपीने नेमका कोणत्या कारणामुळे हल्ला (youth attack on teacher) केला हे मात्र अजून समजू शकलेले नाही. शिरूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन करेवाड या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल

शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय

Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???

सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???

ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!