Tuesday, January 31, 2023

100 रुपयांच्या धान्य किटचा पत्ताच नाही – युवक काँग्रेस करणार तीव्र आंदोलन

- Advertisement -

सकलेन मुलाणी कराड
कराड : हॅलो महाराष्ट्र – राज्यातील शिंदे फडणवीस सरकार ने 100 रुपयात दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाना दिवाळी गिफ्ट देणार असल्याची घोषणा करून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी दिवाळी आली तरीही झालेली नाही यासाठी सरकार ने तात्काळ 100 रु दिवाळी गिफ्ट गरिबांना देण्याची अंमलबजावणी करावी यासाठी युवक काँग्रेस (Congress) तीव्र आंदोलन करणार असून सरकारला गरिबांच्या व्यथाची जाणीव करून देणार अशा आशयाचे निवेदन कराड दक्षिण युवक काँग्रेस च्या वतीने आज प्रांतधिकारी, तहसीलदार व पुरवठा अधिकारी यांना देण्यात आले आहे. यावेळी कराड दक्षिण काँग्रेस अध्यक्ष दिग्विजय पाटील, कराड दक्षिण युवक काँग्रेस (Congress) सरचिटणीस देवदास माने, सातारा जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष राहुल पवार, राम मोहिते, गणेश सातारकर, जयवर्धन देशमुख, आदित्य मोहोलकर, मुबिन बागवान, मुकुंद पाटील, गणेश गायकवाड, प्रभंजन यादव, अविनाश पवार, साद मुजावर आदी यावेळी उपस्थित होते.

गरीबांची दिवाळी गोड व्हावी यासाठी शिंदे-फडणवीस सरकारकडुन दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांसाठी 100 रुपये या दरात रवा, चणाडाळ, साखर आणि पामतेल देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. रेशन दुकानांवर राज्य सरकारच्यावतीने ‘आनंदाचा शिधा’ अशी जाहिरात करणारे फलकही लावण्यात आले. मात्र उद्या दिवाळी सुरू होत असताना दुकानांमध्ये अद्याप या वस्तू उपलब्ध नाहीत तर काही ठिकाणी किटच्या पिशव्या मिळाल्या नसल्यामुळे वस्तूंच वाटप रखडलं आहे. अशा परिस्थितीत जर दिवाळीत गरिबांना किट मिळणार नसेल तर त्या पोकळ घोषणेचा काय उपयोग.

- Advertisement -

शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने तयार पीक डोळ्यासमोरून वाहून गेले अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणे हे सरकारचे कर्तव्य च आहे आणि तरीही सरकार त्यांनी केलेल्या घोषनेची अंमलबजावणी दिवाळी उद्यावर येऊन ठेपली असताना सुद्धा करत नाही तर युवक काँग्रेस (Congress) या सरकार च्या मुजोरी कारभारा विरोधात तीव्र आंदोलन छेडून गरिबांना त्यांच्या हक्काचे 100 रुपयांचे दिवाळी किट मिळण्यासाठी आग्रही भूमिका घेणार असल्याचे यावेळी कराड दक्षिण युवक काँग्रेस अध्यक्ष दिग्विजय पाटील यांनी सांगितले.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!