हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सत्ताधाऱ्यांविरोधात नेहमी आवाज उठवणाऱ्या आणि प्रश्न उपस्थित करणाऱ्या प्रसिद्ध यूट्यूबर ध्रुव राठीच्या (Dhruv Rathee) अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, महाराष्ट्र सायबर सेलने फेक न्यूजशी संबंधित एका प्रकरणांमध्ये ध्रुव राठीविरोधात एफआयआर दाखल केली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या मुलीबाबत चुकीची माहिती पसरवल्याप्रकरणी सायबर सेलने ही कारवाई केली आहे. त्यामुळे आता ध्रुव राठी वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
खरे तर, हे थेट कारवाई ध्रुव राठीविरुद्ध करण्यात आलेली नाही. तर त्याच्या नावाने सुरू असलेल्या ध्रुव राठी पॅरडी या बनावट (Fake Account) खात्याविरोधात करण्यात आली आहे. याच खात्यावर “लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची मुलगी अंजली बिर्ला हीने परीक्षा न देता यूपीएससीमध्ये यश मिळवलं” अशी पोस्ट करण्यात आली होती. त्यानंतर या खात्यासंदर्भात 9 पोस्टच्या लिंकचा आधार या अकाऊंटवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या सर्व प्रकरणांमध्ये ध्रुव राठी याने म्हणले आहे की, ज्या ट्विटर अकाऊंटवर गुन्हा दाखल झालाय ते पॅरडी अकाऊंट आहे. माझा त्याच्याशी काही संबंध नाही. महत्त्वाचे म्हणजे, ध्रुव राठी हा आपले अधिकृत ट्विटर अकाउंट dhruv_rathee या नावाने चालवतो. परंतु, अंजली बिर्ला यांच्या विरोधातील पोस्ट ही “ध्रुव राठी पॅरडी” या अकाउंटवरून करण्यात आली आहे. त्यामुळे आता पोलीस या सर्व प्रकरणाचा तपास करीत आहेत.