IPL 2025 : झहीर खानवर मोठी जबाबदारी; या पदासाठी झाली निवड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IPL 2025 साठी लखनौ सुपरजाईंटने (Lucknow Super Giant) भारताचा माजी क्रिकेटपटू आणि जलदगती गोलंदाज झहीर खानची(Zaheer Khan) मेंटॉर पदावर नियुक्ती केली आहे. यापूर्वी गौतम गंभीर लखनौचा मेंटॉर होता, त्यानंतर २०२४ च्या आयपीएल मध्ये गंभीर कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटॉर झाला आणि तेव्हापासून हे पद रिक्त होते. जस्टिन लँगर लखनऊ सुपरजाईंटचा प्रशिक्षक झाला, मात्र त्यावेळी लखनौचा संघ संपूर्ण स्पर्धेत गडबडला. आता फ्रेंचायजीने झहीर खानची मेंटॉर पदी निवड केली आहे. लखनऊ सुपर जायट्ंसने आपल्या अधिकृत खात्यावरुन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर व्हिडिओ शेअर करुन ही माहिती दिली आली.

झहीर खान हा आत्तापर्यंत ३ संघाकडून आयपीएल खेळला आहे. त्याने रॉयल चॅलेंजर बंगळुरू, मुंबई इंडियन्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून प्रतिनिधीत्व केलं आहे. यपीएल मध्ये झहीर खानने 100 सामने खेळले आहेत. झहीरकडे क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे. एकेकाळचा भारतीय संघाचा टॉपचा गोलंदाज म्हणून त्याच्याकडे बघितलं जाते.त्यामुळे झहीरच्या अनुभवाचा लखनौ सुपरजाईंटला आणि खास करून लखनौच्या गोलंदाजीला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. सध्या लखनौ सुपरजाईंटच्या टीम मॅनेजमेन्ट आणि कोचिंग स्टाफबाबत बोलायचं झाल्यास, जस्टिन लँगर हे मुख्य कोच आहेत. लान्स क्लुसनर आणि ॲडम व्होजेस हे सहाय्यक प्रशिक्षक आहेत. आता या स्टाफमध्ये झहीर खानचा समावेश झाला आहे.

झहीर खानची गणना भारतात क्रिकेट खेळलेल्या सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांमध्ये केली जाते. दोन दशकांहून अधिक काळ चाललेल्या कारकिर्दीत, त्याने एक खेळाडू आणि प्रशिक्षक या दोन्ही भूमिकेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. 8 ऑक्टोबर 1978 रोजी महाराष्ट्रात जन्मलेल्या, झहीर खानने 2000 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि अगदी कमी वेळेत तो भारतीय क्रिकेट संघात एक प्रमुख गोलंदाज बनला. 2003 च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या आणि त्यानंतर 2011 चा एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा तो प्रमुख सदस्य होता. झहीरने 2011 च्या सामन्यात केवळ 9 सामन्यात 21 विकेट घेतल्या होत्या. नवीन चेंडू स्विंग करण्याची आणि जुना चेंडू रिव्हर्स स्विंग करण्यात झहीर माहीर आहे. 2015 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर झहीर खानने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससोबत काम केले. युवा गोलंदाजांना मार्गदर्शन करण्याची कला झहीरच्या अंगात आहे. लखनौचा बॉलिंग कोच मोर्ने मॉर्केल टीम इंडिया सोबत जोडला गेल्यानंतर आता झहीर खानच्या अनुभवाचा संघाला फायदा होऊ शकतो.