Zerodha Gold ETF : सोन्यात गुंतवणुकीची मोठी संधी; Zerodha ने लाँच केला Gold ETF

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Zerodha Gold ETF : आजकाल पैशाची गुंतवणूक करण्यासाठी अनेक मार्गाचा वापर केला जातो. काहीजण बँकेत पैशाची गुंतवणूक करतात, काहीजण म्युच्युअल फंडात पैसे गुंतवणूक तर असेही अनेकजण आहेत ते सोने खरेदीमध्ये पैशांची गुंतवणूक करत असतात. जर तुम्ही सुद्धा सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण Zerodha Fund House ने आपली नवीन योजना Gold ETF लाँच केली आहे. Zerodha Gold ETF योजना 16 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी 2024 पर्यंत गुंतवणूकदारांसाठी अर्ज करण्यासाठी खुली असेल आणि ते 1 मार्च 2024 रोजी BSE आणि NSE वर लिस्टेड केली जाईल. ही योजना नेमकी आहे तरी काय याबाबत आज आपण जाणून घेऊयात…

शेअर्सप्रमाणे सोने खरेदी करण्याच्या सुविधेला गोल्ड ईटीएफ म्हणजेच एक्सचेंज ट्रेडेड फंड म्हणतात. ही एक म्युच्युअल फंड योजना आहे, ज्यामध्ये युनिट्समध्ये सोने खरेदी केले जाते. एक गोल्ड ईटीएफ युनिट म्हणजे पूर्ण शुद्ध1 ग्रॅम सोने. देशांतर्गत बाजारातील सोन्याच्या किमतीच्या कामगिरीवर आधारित परतावा निर्माण करणे हा Zerodha चा मुख्य उद्देश आहे. हाच हेतू डोळ्यसमोर ठेऊन कंपनीने ही योजना लाँच केली आहे. तुम्ही जर झिरोधाच्या Gold ETF मध्ये गुंतवणूक (Zerodha Gold ETF) करू इच्छित असाल तर यासाठी कमीत कमी 500 रुपये आणि त्यानंतर 100 रुपयांच्या पटीत गुंतवणूक केली जाऊ शकते.

ज्या गुंतवणूकदारांना दीर्घकालीन भांडवली वाढ हवी आहे आणि सोन्यासारख्या मालमत्ता वर्गात गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी ही योजना (Zerodha Gold ETF) एक चांगला पर्याय आहे. या योजनेच्या एका युनिटचे सुरुवातीची निव्वळ मालमत्ता मूल्य (एनएव्ही) सुमारे 10 रुपये असेल. त्याच वेळी, सूचीबद्ध केल्यानंतर, Zerodha Gold ETF चे युनिट्स थेट एक्सचेंजमधून खरेदी केले जाऊ शकतात. झिरोधाच्या या नव्या फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचा 95% ते 100% पैसा हा भौतिक सोनेआणि सोन्याशी संबंधित साधनांमध्ये गुंतवणूक केली जाईल. तर, 0% ते 5% पैसे कर्ज, मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट्स, रोख आणि रोख साधनांमध्ये गुंतवले जातील

गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणुकीचे फायदे – Zerodha Gold ETF

दागिने बनवणे विनामूल्य
शुद्ध सोने मिळेल
तुमचे सोने सुरक्षित राहते
खरेदी आणि विक्रीची सुलभता