हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | संपूर्ण राज्यामध्ये सध्या झिका व्हायरसचा प्रभाव मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. आणि झिका वायरसच्या वाढत्या संसर्गामुळे आरोग्य विभागाची चिंता देखील आता वाढली आहे. राज्यामध्ये आत्तापर्यंत झिका व्हायरसचे 140 रुपये सापडलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यातील सगळ्यात जास्त रुग्ण हे पुण्यामध्ये सापडलेले आहेत. पुण्यामध्ये झिका व्हायरसचे 109 रुग्ण आहेत आणि या रुग्णांपैकी जवळपास निम्म्या गर्भवती महिलांना झिका वायरसची लागण झालेली आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आता सार्वजनिक आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना जारी केलेल्या आहेत.
राज्यातील जवळपास 2068 संशयित झिका रुग्णांचे रक्त नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहे. या रुग्णांपैकी 140 जणांचे झिकाचे निदान झाल्याचे समोर आले आहे. ज्या परिसरात या झिका व्हायरसचे रुग्ण आढळले आहेत. तेथील जवळपास तीन ते पाच किलोमीटर परिसरात सगळ्या लोकांचे सर्वेक्षण आरोग्य विभागाकडून सुरू झालेले आहे. झिका व्हायरसची लागण एडीस इजिप्ती डास चावल्यामुळे होत असतो. यासाठी कीटकनाशके फवारणीसह इतर प्रतिबंधात्मक उपाय योजना देखील चालू आहेत. असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलेले आहेत.
झिका वायरसची लक्षणे
भिका व्हायरसची लागण झाल्यावर सांधेदुखी, डोकेदुखी, डोळे लाल होणे, उलटी होणे, अस्वस्थपणा वाटणे यांसारखी लक्षणे दिसतात. ही लक्षणे झीका व्हायरसच्या पाच पैकी एक रुग्णांमध्ये दिसतात. तर काही रुग्णांमध्ये डोकेदुखी, ताप, शरीरावर लाल चट्टे दिसतात. अशी लक्षणे दिसतात.
गर्भवती महिलांना अधिक धोका
झिका वायरसची लागण गर्भवती महिलांना झाली, तर गर्भातील बाळाला मेंदूशी संबंधित आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे जर झिका व्हायरस ची लक्षणे दिसत असतील तर लगेच डॉक्टरांशी संपर्क साधावा. अन्यथा त्याची लागण लहान मुलांना देखील होऊ शकते.
झिका व्हायरसचा संसर्ग टाळायचा असेल, तर तुम्ही घरामध्ये स्वच्छता ठेवा. तसेच घराच्या आत डास येऊ देऊ नका. घराच्या खिडक्यांना तसेच दरवाजांना जाळी लावा. जर दोन दिवसापेक्षा जास्त दिवस ताप राहिला, तर लगेच डॉक्टरांची संपर्क साधून उपचार चालू करा.