Zomato Platform Fee Hike : Zomato वरून जेवण ऑर्डर करणे महागले!! प्लॅटफॉर्म शुल्कात मोठी वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म Zomato वरून जेवण ऑर्डर करणं आता महागले आहे. कंपनीने आपल्या प्लॅटफॉर्म शुल्कामध्ये २५ टक्क्यांनी वाढ (Zomato Platform Fee Hike) करत ग्राहकांना जोर का झटका दिला आहे. एवढच नव्हे तर झोमॅटोने आपली इंटरसिटी लीजेंड्स सेवाही बंद केली आहे. मार्च तिमाहीचे निकाल जाहीर होण्यापूर्वी Zomato ने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे झोमॅटोच्या ग्राहकांना मोठा दणका बसला आहे.

खरं तर यापूर्वी झोमॅटोने ऑगस्ट 2023 मध्ये प्लॅटफॉर्म फी 2 रुपये पासून सुरू केली. कंपनीने नफा मिळवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे तेव्हा सांगितलं होते. यानंतर कंपनीने आपल्या प्लॅटफॉर्म फी मध्ये सतत वाढ करत ग्राहकांना धक्का दिला. 2 रुपयांपासून सुरु झालेली प्लॅटफॉर्म फी नंतर 3 रुपये करण्यात आली, त्यानंतर जानेवारी महिन्यात ती 4 रुपये झाली. आता तुम्हाला प्रत्येक झोमॅटो ऑर्डरवर ५ रुपये द्यावे लागतील. प्लॅटफॉर्म फी (Zomato Platform Fee Hike) वाढल्यामुळे डिलिव्हरी चार्जेसवरील जीएसटीही वाढेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.

झोमॅटोच्या शेअर्समध्ये वाढ – Zomato Platform Fee Hike

दरम्यान, जानेवारीमध्ये फी वाढल्यानंतर झोमॅटोच्या शेअर्समध्ये वाढ झाली होती. Zomato दरवर्षी जवळपास 85 ते 90 कोटी ऑर्डर डिलिव्हरी करते. कंपनी जेव्हा आपल्या प्लॅटफॉर्म शुल्कात एक रुपयांची वाढ करते तेव्हा कंपनीला 85 ते 90 कोटी रुपये एक्सट्रा मिळतात. त्यामुळे झोमॅटोला मोठा फायदा होतो. एकीकडे शुल्क वाढवण्याचा निर्णय घेत असताना झोमॅटोने आणखी एक निर्णय घेत इंटररिटी लिजेंड्स सेवा रद्द केली आहे. या सेवेअंतर्गत कंपनी एका शहरातील टॉप रेस्टॉरंटमधील अन्नपदार्थ दुसऱ्या शहरातील ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ऑर्डर स्वीकारायची. मात्र, सध्या ही सेवा थांबवण्यात आली आहे. कंपनीच्या वेबसाईटवर ‘लिजेड्स’ वर क्लिक केल्यावर सेवा तात्पुरती स्थगित असून आम्ही लवकरच तुमच्या सेवेत येऊन अशी सूचना पाहायला मिळत आहे.