पेट्रोल मिळेना म्हणून झोमॅटोचा बॉय डिलिव्हरी पोहोचवण्यासाठी घोड्यावर स्वार; Video Viral

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| हिट-अँड-रन कायद्याला विरोध दर्शवत देशभरामध्ये ट्रक चालकांचे गेल्या दोन दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. ट्रक चालकांच्या या संपामुळे पेट्रोल पंप देखील बंद पडायची वेळ आली आहे. या देशभरात पेट्रोलचा तुटवडा जाणवत असल्यामुळे झोमॅटोच्या एका डिलिव्हरी बॉय ने एक वेगळीच शक्कल लढवली आहे. या बॉयने बाईकचा वापर न करता थेट घोड्यावर स्वार होऊन डिलिव्हरी पोचली आहे. सध्या सोशल मीडियावर याच डिलिव्हरी बॉयचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ हैदराबादच्या चांचलगुडा भागातील असल्याचे सांगितले जात आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय घोड्यावर स्वार होताना दिसत आहे. महत्वाचे म्हणजे, “ऑर्डर घेऊन निघालो, मात्र तीन तास रांगेत थांबूनही पेट्रोल मिळालं नाही..” असे असे देखील हा डिलिव्हरी बॉय एका व्यक्तीला सांगताना दिसत आहे. यातूनच सध्या पेट्रोलच्या तुटवड्यामुळे नागरिकांचे हाल कसे होत आहेत हे दिसत आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर या डिलिव्हरी बॉयचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत. महत्वाचे म्हणजे ट्रक चालकांना पाठिंबा दर्शवण्यासाठी वा मार्केटिंग करण्यासाठी झोमॅटोने ही शक्कल लढवली असल्याचे देखील अनेकांनी म्हटले आहे. मात्र अद्याप या व्हिडिओमागील खरे कारण समोर आलेले नाही.