Zombie Virus : कोरोना व्हायरस ने संपूर्ण जगाच्या नाकी नऊ आणले होते. तो काळ आठवला तरी आजही भीती वाटल्याशिवाय राहत नाही. आता शाश्त्रज्ञानी कोरोनापेक्षा भयंकर व्हायरस बाबत चेतावणी दिली आहे. वितळणारा आर्क्टिक पर्माफ्रॉस्ट झोम्बी व्हायरस (Zombie Virus) सोडू शकतो, असे द गार्डियनच्या अहवालात सांगितले आहे. या व्हायरस मुळे पुन्हा एकदा कोरोना काळासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. ग्लोबल वॉर्मिंगमुळे वाढत्या तापमानामुळे गोठलेला बर्फ वितळू लागला आहे. त्यामुळे धोका वाढला आहे.
या विषाणूचे (Zombie Virus) धोके अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी, एका शास्त्रज्ञाने गेल्या वर्षी सायबेरियन पर्माफ्रॉस्टमधून घेतलेल्या नमुन्यांमधून काही विषाणूंना पुनरुज्जीवीत केले होते. हा विषाणू हजारो वर्षे जमिनीखाली गोठवून ठेवलेल्या अवस्थेत होता. जीन-मिशेल क्लेव्हरी, एक्स-मार्सिले विद्यापीठातील अनुवांशिकशास्त्रज्ञ, म्हणाले: ‘सध्या, साथीच्या जोखमीचे विश्लेषण दक्षिणेकडील प्रदेशांमध्ये उद्भवू शकणार्या आणि नंतर उत्तरेकडे पसरलेल्या रोगांवर केंद्रित आहे. उत्तरेत असे विषाणू (Zombie Virus) आहेत जे एक नवीन साथीचा रोग सुरू करू शकतात.
मोठी महामारी येऊ शकते
रॉटरडॅममधील इरास्मस मेडिकल सेंटरचे शास्त्रज्ञ मारियन कूपमन्स यांनी सहमती दर्शवली, ‘परमाफ्रॉस्टमध्ये कोणते विषाणू आहेत हे आम्हाला माहित नाही. परंतु मला वाटते की सर्वात मोठा धोका हा आहे की कोणीतरी व्हायरस ट्रिगर केल्यास मोठी महामारी येऊ शकते. हा पोलिओचा प्राचीन प्रकार असू शकतो. हजारो वर्षे पर्माफ्रॉस्टमध्ये दफन करूनही जिवंत विषाणू (Zombie Virus) एकल-कोशिक जीवांना संक्रमित करू शकतात. 2014 मध्ये सायबेरियातील क्लेव्हरी यांच्या नेतृत्वाखालील शास्त्रज्ञांच्या पथकाला हा व्हायरस निदर्शनास आला होता.
48,500 वर्षे जुना विषाणू
गेल्या वर्षी तपासानंतर प्रकाशित झालेल्या माहितीवरून असे दिसून आले की सात वेगवेगळ्या सायबेरियन ठिकाणांवरील अनेक विषाणू (Zombie Virus) संसर्ग पसरवण्यास सक्षम होते. विषाणूचा नमुना ४८,५०० वर्षे जुना आहे. ‘आम्ही वेगळे केलेले विषाणू केवळ अमिबास संक्रमित करण्यास सक्षम होते आणि ते मानवांसाठी धोका नव्हते,’ क्लेव्हरी म्हणाले. परंतु याचा अर्थ असा नाही की सध्या पर्माफ्रॉस्टमध्ये गोठलेले व्हायरस असे करण्यास सक्षम असू शकत नाहीत. उत्तर गोलार्धाचा एक पंचमांश भाग पर्माफ्रॉस्टने व्यापलेला आहे. हे टाइम कॅप्सूलसारखे आहे, ज्यामध्ये अनेक प्राचीन जीवांच्या अवशेषांसह ममीफाइड विषाणू (Zombie Virus) असतात.