Zontes 350R : भारतात लॉन्च झाली Zontes 350R स्ट्रीटफायटर बाईक; पहा किंमत आणि वैशिष्ट्ये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चिनी दुचाकी (Zontes 350R) उत्पादक कंपनी Zontes ने आपली 350R स्ट्रीटफाइटर मोटरसायकल भारतात लॉन्च केली आहे. या स्पोर्ट बाईकची सुरुवातीची किंमत 3.15 लाख रुपये असून रंगानुसार गाडीची किंमत 3.37 लाख रुपयांपर्यंत जाते. ही स्पोर्ट बाईक KTM 390 Duke आणि BMW G 310 R ला तगडी फाईट देईल. आज आपल्या बाईक रिव्हिव्ह मध्ये जाणून घेऊया या दमदार गाडीची खास वैशिष्ट्ये ..

वैशिष्ट्ये-

Zontes च्या या बाईकला एक एंगुलर हेडलॅम्प मिळतो. गाडीला मोठी इंधन टाकी, स्लॅश-कट एक्झॉस्ट आणि स्टेप-अप स्टाइल सीट्स मिळतात. इंधन (Zontes 350R) टाकीची क्षमता 15 लिटर आहे.या बाईकला ऑल-एलईडी लाइटिंग, स्लिपर क्लच, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह 5.0-इंच एलसीडी इन्स्ट्रुमेंट कन्सोल, कीलेस कंट्रोल्स, ड्युअल फास्ट चार्जिंग यूएसबी, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि बरेच काही मिळते.

Zontes 350R

 इंजिन- (Zontes 350R)

गाडीच्या इंजिनबाबत बोलायचं झाल्यास, यामध्ये 348 cc, सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन आहे. हे इंजिन 9,500 rpm वर सुमारे 37.4 bhp ची पॉवर आणि 7,500 rpm वर 32 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. याशिवाय बाइकमध्ये चार राइडिंग मोड उपलब्ध आहेत. बाइकला सस्पेन्शनसाठी 43 mm USD फ्रंट फोर्क्स आणि मागील बाजूस मोनोशॉक मिळतो. ब्रेकिंग साठी फ्रंटला 320 मिमी डिस्क आणि मागील बाजूला 265 एसएस रोटरसह ड्युअल चॅनेल ABS सह कॉन्ट्रोल केलं जाते.

Zontes 350R

किंमत-

गाडीच्या किमतीबाबत बोलायचं झाल्यास, वेगवेगळ्या रंगानुसार किमतीत बदल पहायला मिळत आहे. त्यानुसार सर्व गाड्यांच्या किमती खालीलप्रमाणे

Zontes 350R Blue- 3,15,000
Zontes 350R Black- 3,25,000
Zontes 350R White – 3,25,000
Zontes 350X Black and Gold- 3,35,000
Zontes 350X Silver and Orange- 3,45,000
Zontes 350X Black and Green- 3,45,000
Zontes GK350 Black and Blue- 3,37,000

हे पण वाचा : 

Electric Scooter : 2 स्वस्त इलेक्ट्रिक स्कुटर लॉन्च; 47 हजारांपासून सुरू होते किंमत

Flying Bike : अबब!! हवेत उडणारी बाईक; 100 किमी प्रतितास वेग

Kawasaki Z900 : Kawasaki ने लॉन्च केली नवी Bike; पहा किंमत आणि फीचर्स

Dlite RX-100 : Dlite ने सादर केली नवी इलेक्ट्रिक स्कुटर; एका चार्जवर 70 किमी धावणार