संतापजनक ! अमरावतीच्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने दारू पिऊन वर्गात घातला धिंगाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती : हॅलो महाराष्ट्र – अमरावती जिल्ह्यातील एका जिल्हा परिषद शाळेत एक संतापजनक घटना घडली आहे. यामध्ये या शाळेतील एका शिक्षकाने विद्यादानाचे कार्य सोडून विद्यार्थ्यांना शाळेला सुट्टी असल्याचे सांगितले. तसेच दारू पिऊन (zp school teacher drunked) खुर्चीवर झोपला आणि दारुच्या नशेत तिथेच लघूशंका केली. या सगळ्या प्रकारामुळे (zp school teacher drunked) शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली आहे.

काय घडले नेमके?
अमरावतील जिल्ह्यातील धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद शाळा काकरमल या ठिकाणी हि संतापजनक घटना (zp school teacher drunked) घडली आहे. पृथ्वीराज नेत्रराम चव्हाण असे या दारुड्या शिक्षकाचे नाव आहे. त्याने दुपारी शाळेत हजर विद्यार्थ्यांना शाळेला सुटी झाल्याचे सांगितले. यानंतर मस्त दारू पिऊन खुर्चीवर (zp school teacher drunked) झोपून गेला व तिथेच लघुशंका केली. हा प्रकार विद्यार्थ्यांनी पाहिल्यानंतर त्यांनी त्यांच्या पालकांना शाळेत बोलावून आणले. यानंतर पालकांनी या शिक्षकाचा चांगलाच समाचार घेतला.

या संतापजनक प्रकारची (zp school teacher drunked) माहिती मिळताच उपसरपंच अशोक कासदेकर पालक वर्ग सुरेंद्र पटोरकर, भुरेलाल बेठेकर शाळा वयवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश जांभेकर उपाध्यक्ष नंदलाल जावरकर हे शाळेत पोहचले. शाळेत शिक्षक पृथ्वीराज चौहान हा दारूच्या नशेत (zp school teacher drunked) खुर्चीवर बसून टेबलवर पाय ठेवून तेथेच लघुशंका केलेल्या अवस्थेत आढळून आले. यानंतर पालकांनी धारणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश पाटील यांच्याकडे लेखी तक्रार करत या शिक्षकावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई
धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या
Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर
हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल
INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर