उदयनराजे यांनी केली भाजप ‘प्रवेशाची’ अधिकृत घोषणा; म्हणाले, लढाई ‘रयतेच्या विकासासाठी’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । उदयनराजे भोसले यांनी आज अधिकृतपणे स्पष्ट केले की आपण भाजप प्रवेश करणार आहोत. ही माहिती त्यांनी ट्विटरवरुन देत सांगितले की, पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह, नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आपण उद्या भाजपमध्ये जाहीर प्रवेश करणार आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून चघळत असलेला उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाच्या विषयावर आज अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे.

ट्विट करुन उदयनराजे भोसले यांनी ही माहिती दिली. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे, आजपर्यंत आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमाच्या व आशीर्वादाच्या जोरावर समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळत राहिली. अपेक्षा आहे आपले हेच प्रेम व आशीर्वाद अविरत माझ्या पाठीशी राहील.

याआधीच चर्चा सुरु झाली की, उदयनराजे भाजप प्रवेशाच्या दुसऱ्याच दिवशी लगेचच 15 सप्टेंबरला मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह महाजनादेश यात्रेत उतरणार करणार आहे.

उदयराजे राजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगत असताना गुरुवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनीच उदयनराजेंची भेट घेतली होती. शरद पवार यांनी भेट घेतल्यानंतर ही भेट उदयनराजेंच्या मनधरणीसाठी असल्याची चर्चा सुरु झाली. यावेळी शरद पवार यांनी उदयनराजेंशी चर्चा देखील केली. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे आणि आमदार शशिकांत शिंदे उपस्थित होते.

इतर महत्वाच्या बातम्या-

उदयनराजेंनी भाजप प्रवेशासाठी ठेवल्या होत्या या दोन अटी ; भाजप पक्ष श्रेष्ठींनी हिरवा सिग्नल देतात राजेंनी केली पक्षांतराची घोषणा

पक्षाने उमेदवारी दिली तर लढेन -शिवसेना प्रवेशानंतर ‘भास्कर जाधव’ यांची प्रतिक्रिया

उदयनराजेंनी जाहीर केली भाजप प्रवेशाची तारीख ; ट्विटर वरून केली घोषणा

कट्टर शिवसैनिक असल्याने मन स्वस्थ बसू देत नव्हतं ; शिवसेना प्रवेशावेळी भास्कर जाधवांचे उद्गार

‘त्या’ कुत्र्यांची हत्या करणारे अखेर पोलिसांच्या ताब्यात…

Leave a Comment