अंबिका आणि अरुणिका जातीच्या झाडांच्या साहाय्याने आता कमी जागेतही फुलवता येणार आहे आमराई 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। आंबा तसे सगळ्यांचे आवडते फळ आहे.  या फळांच्या लागवडीसाठी भरपूर जागा लागत असल्याने प्रत्येकाला या फळाची लागवड करता येतेच असे नाही. दिवसेंदिवस जमीन कमी होऊ लागली आहे. पण आता आपल्याकडे कमी जागा जरी असेल तरी  आमराई करता येऊ  शकणार आहे. आता शास्त्रज्ञांनी आंब्यांच्या दोन जाती शोधल्या आहेत. या जातीची झाडे  आकाराने लहान असतात. या जातींचे नाव अंबिका आणि अरुणिका असे आहे. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ स्बट्रॉपिकल हॉर्टिकल्चर (केंद्रीय उपोष्णकटिबंधीय बागायती संस्था) द्वारे या जाती विकसीत करण्यात आल्या आहेत.

संकरित वाण असलेले अंम्बिका आणि अरुणिकाला येणारी फुले आकर्षक आहेत. आणि या झाडांचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या वाणांना दरवर्षी फळे येतात. गेल्या शतकाच्या ऐंशीच्या दशकात संकरीत पद्धतीने दोन्ही जाती विकसित करण्यात आल्या आहेत. अंबिकाचे वर्ष 2000 आणि अरुणिकाचे  2005 मध्ये लोकार्पण करण्यात आले. या वाणातील आंबे दिसण्यास सुंदर आहेतच शिवाय चवदार देखील आहेत. अरुणिका हे व्हिटॅमिन ए च्या गोडपणाव्यतिरिक्त, मॅन्फिफेरिन आणि ल्युपॉल सारख्या अनेक कर्करोगविरोधी घटकांनी परिपूर्ण आहे. अरुणिकाची फळे टिकाऊ असतात आणि त्यांना डाग लागल्यानंतरही चवीवर परिणाम होत नाही.

या दोन्ही वाणांची लागवड भारताच्या वेगवेगळ्या हवामानात केल्यावर आढळले की बहुतेक ठिकाणी यशस्वीरित्या त्यांची लागवड करता येते. फळ देण्यामुळे झाडाचा आकार दरवर्षी लहान असतो आणि आम्रपालीसारख्या बटू प्रकारापेक्षा अरुणिकाचा आकार ४०टक्के कमी असतो. अरुणिका वेगवेगळ्या हवामानातही चांगल्या पद्धतीने फळ देते.  मग ते उत्तराखंड असो किंवा ओडिसाचा समुद्रकिनारपट्टीतील भाग असो तेथे अरुणिकानी आपल्या चवीने सर्वांचे मन जिंकले आहे. अंबिका हा वाण गुजरात, महाराष्ट्र, आंध्र प्रेदशासह इतर अनेक राज्यात लोकप्रिय आहे. आम्रपाली या वाणाचे झाडही आकाराने लहान असते, परंतु आम्रपालीपेक्षा अरुणिका या वाणाचे झाड  अधिक लहान असते, यामुळे लोकांनी अरुणिकाला पसंत केले आहे. नियमित स्वरुपात आंब्याच्या झाडाला मोहोर येऊन मोठ्या प्रमाणात फळे येणे हे या वाणाचे वैशिष्ट्ये आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

You might also like