अकलूज मध्ये १०० वर्षे जुन्या गौरीची प्रतिष्ठापना

0
54
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी | गणेशोत्सवा पाठोपाठ आज घरोघरी गौरींचे आगमन झालेल आहे. सोलापूर जिल्ह्यातील अकलूज मध्ये शंभर वर्षे जुन्या मुखवट्यांची पुजा होते.  सायंकाळी गौरींच आगमन अत्यंत आनंदी आणि उत्साही वातावरणात झाल आहे. सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील चंद्रशेखर गुळवे यांच्या कुटूंबात गौरी बसवण्याची परंपरा शंभर वर्ष जुनी आहे.

विशेष म्हणजे गुळवे यांच्या घरातील गौरीचे मुखवटे हे सुध्दा शंभर वर्षे जुने आहेत. गुळवे यांच्या आजीना त्यांच्या आईने हे मुखवटे दिले होते. शाडू पासून बनवलेले या मुखवट्यांना गुळवे कुटूंबाने भक्तीभावाने जतन केले आहे. या मुखवट्यांना तेव्हा पासून आज पर्यंत रंग सुध्दा दिला नाही. गुळवे कुटूंब दरवर्षी या शंभरी पूर्णं केलेल्या गौरींच आनंदाने स्वागत करून पाहुणचार करतात. या निमित्ताने त्यांच्या कुटुंबातील सर्व जण एकत्र येतात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here