Thursday, March 23, 2023

अल्पवयीन मुलांच्या अपहरणाचा प्रयत्न फसला; पोलिसांच्या सतर्कतेने मुले सुरक्षित

- Advertisement -

सांगली प्रतिनिधी । सांगलीतील तीन अल्पवयीन मुलांचे अपहरण करुन त्यांना पळवून नेण्याचा प्रयत्न सांगलीतील विश्रामबाग पोलिस आणि सातारा रेल्वे पोलिसांनी हाणून पाडला आहे. या पोलिसांनी सतर्कता दाखवल्याने ही मुले सुरक्षित आहेत.

रात्री ११ च्या सुमारास मिरजेतून महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून तीन मुलांना घेऊन एकजण मुंबईकडे प्रवास करत होता. यावेळी मुलांना घेऊन जाणाऱ्या संशयिताला रेल्वे पोलिसांनी साताऱ्यात मध्यरात्रीच्या सुमारास ताब्यात घेतलं. रमेश श्रीरंग झेंडे असे त्या अपहरणकर्त्याचे नाव आहे. अपहरण केलेली मुले सांगलीच्या हनुमान नगर परिसरातील होती. ती कालपासून गायब होती.

- Advertisement -

ही तीनही मुले सुखरुप आहेत. मुलांना फूस लावून त्यांचे अपहरण करुन घेऊन जाणाऱ्या व्यक्तीकडे विश्रामबाग पोलीस अधिक चौकशी करत असून यातून मुलाचे अपहरण करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.