अशा घडला जालियनवाला बाग हत्याकांड

0
32
Jalianvala baugh massacre history in marathi
Jalianvala baugh massacre history in marathi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
स्वातंत्र्य दिन विशेष २०१९ । शीख धर्मियांच्या पवित्र सुवर्ण मंदिरापासून फक्त दिड किलोमीटर अंतरावर एक बाग आहे. त्याबागेत लोक शांततेत निशस्त्र एकत्रित झालेले. १३एप्रिल १९१९चा दिवस.बागेत चार हजार लोक रॉलेट एक्‍टचा विरोध करण्यासाठी एकत्रित आले होते. सरकारच्या संचारबंदीची त्यांना कसलीच कल्पना नव्हती. एकच दरवाजा असलेल्या बागेला इंग्रज सैनिकांनी वेढा दिला. अंधाधुंद गोळ्यांचा मारा सुरू झाला. निष्पाप लोक सैरभैर पळू लागले. काहींनी वाचण्यासाठी बागेत असलेल्या विहिरीत लपणे पसंत केले. परंतु त्या विहरीने पण त्या लोकांना आसरा देण्यासाठी नकार दिला. ९१ इंग्रज सैनिकांच्या ९१बंदुका एकसारख्या आग ओखत होत्या. बागेच्या दरवाजाकडे कोणीच जाऊ शकत नव्हते. कारण चिंचोळ्या दरवाजाला इंग्रज सैनिकांनी वेढले होते. इंग्रज सैनिकांच्या बंदुकीतील गोळ्या संपल्या होत्या. रक्ताचा चिखल झाला होता. १ हजार लोक शहीद झाले होते. त्यातील १२० लोकांचे मृतदेह विहरीत सापडले होते. १५०० लोक गंभीर जखमी झाले होते. त्या बागेचे नाव आहे “जालियनवाला बाग”.
जनरल रेजिनैल्‍ड डायर हा रॉलेट एक्‍टचा कडवा समर्थक होता म्हणूनच त्याने जालियनवाला बागेत हत्याकांड घडवून आणले होते. जालियनवाला बागेत झालेल्या हत्याकांडाची जगभर निंदा झाली. अर्ध्या जगावर राज्य असणाऱ्या ब्रिटिशांना शरमेने मान खाली घालावी लागली. जनरल डायरच्या विरोधात हाऊस ऑफ कॉमनला ठराव पास करावा लागला.
या हत्याकांडाची धग भारतात वाऱ्यासारखी पसरली जनरल डायरच्या विरोधात देशभर निदर्शने झाली. शेवटी मजबुरीने १९२० साली जनरल डायरला राजीनामा देऊन मायदेशी परतावे लागले. भारतीयांच्या स्वातंत्र्याची आग दडपण्यासाठी घडवलेल्या हत्याकांडातून स्वातंत्र्याचा अग्नी दडपण्याऐवजी उफाळूनवर आला. जनरल डायरला त्याच्या पापाचे फळ देण्यासाठी उदम सिंह यांनी लंडनच्या कैक्सटन हॉलमध्ये गोळ्या झाडून त्याला ठार केले (१३मार्च१९४०).
बारा वर्षांच्या भगतसिंगावर या घटनेचा खूपच खोलवर परिणाम झाला होता. ते १९ किलोमीटरचे अंतर पायी कापून जालियनवाला बागला भेट देण्यासाठी आले होते. आशा रीतीने स्वातंत्र्याची ठिणगी पेटण्यासाठी जालियनवाला बाग हत्याकांड कारणीभूत ठरले.

सुरज शेंडगे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here