आता शेती अवजारांसाठी मिळणार ८०% अनुदान, केंद्र सरकारची नवी योजना 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। केंद्र सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी नवी तरतूद करण्यात आली आहे. सरकरने एक नवीन योजना सुरु करून शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.  या योजनेद्वारे फार्म मशिनरी बँकेची तरतूद करण्यात आली आहे. आजच्या काळात आधुनिक शेती करत असताना वेगवेगळ्या मशिनरीशिवाय शेतीला पर्याय नसल्याचे दिसून येते आहे. म्हणूनच केंद्र सरकारनेशेतकऱ्यांसाठी फार्म मशिनरी बँकेची तरतूद करण्याची योजना आखली आहे.

शेतकरी त्यांच्या फार्म मशिनरी बँकेत सीड फर्टीलायजर ड्रील, प्लाऊ, थ्रेसर, टिलर, रोटावेटर यांसारख्या उपकरणाची अनुदानीत रकमेवर खरेदी करु शकतात असे सांगण्यात आले आहे.आता उपकरणे भाडे तत्त्वावर उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यासाठी  फार्म मशिनरी बँकेसाठी सरकारकडून गावे एकत्र केली जात आहेत. तुम्हाला जर या बँकेसाठी सरकारकडून आर्थिक मदत मिळवायची असेल तर त्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. तुमच्या भागातील ई – मित्र कियोस्कवर ठराविक रक्कम भरुन अर्ज करता येणार आहे.

या अर्जासोबत फोटो, उपकरण किंवा यंत्राच्या खरेदी बिलाची प्रत, आधार कार्ड, बँक खात्याच्या पासबुकची प्रत आणि इतरही काही पुरावे जोडावे लागणार आहेत अशी माहिती ही देण्यात आली आहे.दरम्यान, कृषी क्षेत्रातील कोणत्याही योजनेअंतर्गत एका यंत्र किंवा उपकरणासाठी तीन वर्षांमध्ये फक्त एकदाच सबसिडी दिली जाणार आहे असे पण सांगण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे यामध्ये सरकारकडून ८० % अनुदानासोबतच इतरही प्रकारची मदत दिली जाणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’ 

You might also like