आरोग्यासाठी ज्वारीची भाकरी आहे खूप उपयुक्त ; होतात ‘हे’ जबरदस्त फायदे

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन। अनेक ठिकाणी आहारात भाकरी या पदार्थांचा समावेश केला जातो. भाकरी या अनेक प्रकारच्या असतात. सामान्यतः महाराष्ट्रा मध्ये बाजरी ज्वारी आणि नाचणी या भाकरी प्रसिद्ध आहेत. भाकरी खाण्याचे अनेक महत्व आहेत. महाराष्ट्राच्या संस्कृतीत भाकरी ला एक वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. अनेक शहरी भागात भाकरी खाल्ली जात नाही. तेथे आहारात जास्त प्रमाणात चपाती चा वापर केला जातो. अनेक वेळा लहान मुले सुद्धा चपाती खाण्याचा अट्टाहास पकडतात.कारण त्यांना भाकरी हा प्रकार आवडत नाही. पालकही मुलांचा हा हट्ट अगदी लाडाने पुरवत असतात. आहारात चपाती खाणचं अंगवळणी पडलेलं असत. या सवयीचा परिणाम मात्र आपल्या आरोग्यावर पडत असतो. ज्वारीची भाकरी खाल्ल्यास आपल्या आरोग्यासाठी अनेक आश्चर्यकारक फायदे आहेत .

मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर

ज्वारी शरीरातील साखरेची पातळी प्रमाणात ठेवण्यास मदत करते त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी ज्वारीची भाकरी अत्यंत गुणकारी ठरते. कारण त्यामध्ये साखरेचे प्रमाण कमी असते. त्यामुळे साखर वाढण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. ज्वारीमध्ये फायबर चे प्रमाण जास्त असते.

त्वचेच्या सुरक्षेसाठी

सुंदर त्वचेसाठी ज्वारी वरदान ठरते. ज्वारीमुळे त्वचेतील मेलनॉमा सेल्सची अधिक निर्मिती होण्यावर नियंत्रण ठेवलं जातं. हे सेल्स त्वचेच्या कर्करोगासाठी जबाबदार मानले जातात. या अनेक वेळा ज्वारीच्या पिठाचा वापर केला जातो. ज्वारीचे पीठ भिजवून त्याचा लेप चेहऱ्यावर दिला जातो.

पोषक घटक मिळतात

ज्वारीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिनांचा समावेश असतो. जास्त मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट्स चा सुद्धा समावेश असतो. एवढंच नव्हे तर पिष्टमय पदार्थ, शर्करा आणि खनिजद्रव्य असे भरपूर घटक ज्वारीत असतात. काॅलेस्टराॅल नियंत्रीत ठेवण्यासाठीही ज्वारीची भाकरी खाल्ल्यास मदत होते. ज्या लोकांना वजन करण्याचे असते. त्या लोकांनी आहारात भाजरीच्या भाकरीचा समावेश करणे गरजेचे असते. यामुळे थोडसं खाऊनही पोट भरल्यासारखं वाटत आणि शरीराला आवश्यक ऊर्जा ही मिळते.

पोटाच्या समस्यांपासून बचाव

भाकरीया अन्नपदार्थ पचायला जास्त कालावधी लागत नाही. ज्वारी पचायला फारच हलकी असते. त्यामुळे ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे. अशा व्यक्तींना ज्वारीची भाकरी लाभदायी ठरते. ज्या लोकांना पोटाचा तसेच गॅस च्या समस्या आहेत त्या लोकांनी भाकरी खाणे आरोग्यास खूप चांगले आहे. पोटाच्या इतर तक्रारींपासूनही भाकरीच्या सेवनाने फरक पडू शकतो

मासिक पाळी आणि गर्भाशयाच्या समस्या

वाढत्या प्रदुषणामुळे आणि दगदगीच्या आयुष्यामुळे महिलांमध्ये मासिक पाळी आणि गर्भाशयाच्या समस्या भरपूर प्रमाणात वाढल्या आहेत. यासाठी आहारात भाकरीचे सेवन असल्याने त्या काळात जास्त रक्तस्राव होत नाही. गर्भाशयात असलेल्या महिलांनी बाजरीच्या भाकरीचे सेवन केल्याने बाळाला दुधाची कमतरता निर्माण होत नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

You might also like