इंजिनीरिंगची नोकरी सोडून आधुनिक पद्धतीने शेती केली; आज महिन्याला कमावतोय लाखो रुपये

Left the job of engineering and farmed in a modern way; Today I am earning lakhs of rupees a month

 हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतीमध्ये तरुण पिढी लक्ष देताना दिसत नाही. त्यांचा नोकरीमधेच जास्त विश्वास असल्याचे दिसून येते. पारंपारिक पद्धतीने करत असलेल्या शेतीमध्ये उत्पन्न तुलनेने कमी होते. यामुळे शेतीवरचा विश्वास हळूहळू कमी होताना दिसून येत आहे नवीन पिढी याला पूर्वीइतकी महत्त्व देताना दिसून येत नाही. परंतु आजही काही तरुण असे आहेत जे अभ्यासपूर्ण शेतीला प्राथमिकता देऊन नवीन तंत्रज्ञानयूत्त शेती करताना आणि त्यातून नफा मिळताना दिसून येतात. असाच एक प्रयोगशील शेतकरी! त्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कोल्हापूरचा अक्षय चौगुले हा तरुण इंजिनीअरिंगचा जॉब सोडून गावी येऊन शेती करत आहे. आणि लाखोंचा नफा सुद्धा कमवत आहे.

अक्षय गाव सोडून इंजिनीअरिंगची नोकरी करू लागला खरा. पण त्याचे मन शेतीमध्ये जास्त रमत होते. म्हणून त्याने नोकरी सोडून पूर्णवेळ शेती करण्याचे ठरवले. आणि तो शेती करण्याचा निर्णय घेऊन गावी आला. गावी येऊन त्याने सुरुवातीला ग्रीन हाऊसच्या मदतीने जरबेरा या फुलाचे उत्पादन घेतले. फुल शेती त्याने तब्बल पाच वर्ष केली. तीस गुंठे जमिनीमध्ये त्याने लाखोंचे उत्पादन काढले. यानंतर त्याने रोपवाटिका तयार करण्याची सुरुवात केली. यामध्ये उसाच्या रोपापासून इतर रोपे तयार करू लागला. रोप घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्याला त्याने रोपा सहित खत व रोग नियंत्रणासाठी वेळोवेळी लागणाऱ्या मार्गदर्शन सेवा पुरवू लागला. यामुळे त्याची विश्वासार्हता अजून वाढली.

शेतीमध्ये यशस्वी प्रयोग करून लाखोंचे उत्पादन घेणारा अक्षय तरुणांनाही आधुनिक शेतीमध्ये भाग घेण्याचे घेण्याचा सल्ला देतो. रोपवाटिकाच्या माध्यमातून गेल्या पाच ते सात महिन्यांमध्ये लाखोचा नफा त्याने कमावला आहे. तसेच नियोजनबद्ध आन तंत्रशुद्ध पद्धतीने शेती केल्यानंतर, शेती तोट्यामध्ये जाण्याचा धोका कमी असतो. भविष्यात त्याला अर्किडची शेती करायची आहे. त्याचाही अभ्यास त्याने करून ठेवला आहे असे अक्षय सांगतो.

You might also like